मालमत्तेची माहिती एका क्लिकवर मिळणार

साडेतीन लाख प्रॉपर्टी कार्ड तयार; खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुलभ
मालमत्तेची माहिती एका क्लिकवर मिळणार
USER

चेतन साखरे । जळगाव jalgaon

मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा (Proof of ownership of the property) म्हणून आतापर्यंत खरेदी-विक्री व्यवहाराच्या (buying and selling transactions) अनुसूची-2चा (इंडेक्स-2) वापर केला जात असे. खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) काळात मालमत्ता धारकांना प्रॉपर्टी कार्ड (Property card) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाखाहून अधिक मिळकतधारकांचे त्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करून ते एका क्लिकवर ऑनलाईन बघता (Looking online) येणार आहेत. दरम्यान या प्रक्रियेत राज्यात जळगाव जिल्हा हा चौथ्या क्रमांकावर राहीला आहे.

शहरी भागांत अपार्टमेंटमध्ये वास्तव्य करणार्‍या नागरिकांना किंवा सदनिकाधारकांना त्यांच्या नावाने मालमत्ता पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) मिळत होते. मात्र राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागातर्फे पुढाकार घेऊन अर्ज केल्यास सर्व कागदपत्रांची छाननी करून, संबंधितांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यापूर्वी, संपूर्ण सोसायटीसाठी एकच प्रॉपर्टी कार्ड मिळत असल्याने अनेक घोळ आणि न्यायालयीन दावे दाखल झाले होते. मालकी हक्कावरून निर्माण होणारे वाद मिटविण्यासाठी प्रॉपर्टी कार्डचा दस्तावेज महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड सहज उपलब्ध

जळगाव जिल्ह्यात 3 लाख 73 हजार 903 मिळकतपत्रिकांची संख्या निश्चीत करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 50 हजार 331 मिळकतधारकांचे ई-प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. याच चोपडा भूमिअभिलेख कार्यालयात- 30111, यावल 39034, रावेर 29138, मुक्ताईनगर 9459, बोदवड 6685, भुसावळ 23724, जळगाव 8816, एरंडोल 18026, धरणगाव 14979, अमळनेर 26285, पारोळा 15515, भडगाव 16011, चाळीसगाव 35261, पाचोरा 22754, जामनेर 22495, जळगाव शहर 32038 अशी प्रॉपर्टी कार्ड तयार असून ती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मिळकतधारकांना आता घरबसल्या एका क्लिकवर प्रॉपर्टीची माहिती मिळणार आहे.

राज्य शासनाने प्रॉपर्टी कार्डबाबत निर्णय घेतल्यानंतर भूमि अभिलेख विभागातर्फे विशेष मोहिम हाती घेण्यात आली. त्यामुळे राज्यात प्रॉपर्टी कार्ड तयार होऊन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत जळगाव जिल्हा चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.

एम.पी. मगर, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com