ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य महासचिवपदी प्रा.जयश्री साळुंके

ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य महासचिवपदी प्रा.जयश्री साळुंके

अमळनेर-प्रतिनिधी amalner

ट्रायबल वुमेन्स फोरमच्या (Tribal Women's Forum) राज्य महासचिवपदी प्रा.जयश्री साळुंके (Prof. Jayashree Salunke) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या जळगांव जिल्ह्यात रुक्मिणीताई कला व वाणिज्य महाविद्यालय अमळनेर येथे इतिहास विभाग प्रमुख आहेत.

ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद घोडाम यांनी त्यांची नियुक्ती केली. प्रा.जयश्री साळुंके यांना अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीचा सावित्रीबाई फुले फेलोशिप अवार्ड, यासह विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले, हे अर्ज, निवेदने, आंदोलने, मोर्चे, उपोषण या माध्यमातून आदिवासी आणि इतर समाजाचे प्रश्न विशेषतः महीलांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.

आदिवासी बांधवांचे जिवनमान उंचवण्यासाठी व त्यांच्यावर होणारे आत्याचार अन्यायाला वाचा फोडून आदिवासी बांधवांचे जिवन सुखकर व्हावे व आदिवासी बांधवांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांचा सर्वागीण विकास व्हावा ह्या साठी ट्रायबल फोरम ही संस्था गेल्या कित्येक वर्षा पासून ही संस्था काम करत आहे.

नुकतीच ह्या संघटनेच्या वतीने त्यांनी आजपर्यंत आदिवासी बांधवांसाठी केलेले लढे व आदिवासी बांधवांना शैक्षणिक क्षेत्रात त्यांना भेडसवनाऱ्या समस्या व त्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे नेण्याचे काम प्रा साळुंके यांनी केले आहे अष्टपैलू व्यक्तीमत्वाची नियुक्ती ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य महासचिव पदी झाल्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com