डोंगरी- तितूर नदीची परिक्रमा करण्यासोबत समस्याही सुटाव्यात..

डोंगरी- तितूर नदीची परिक्रमा करण्यासोबत समस्याही सुटाव्यात..

चाळीसगावकरांची खासदार महोदयांकडून वाढली अपेक्षा

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी -

गिरणा पुनरुज्जीवन अभियानातून (Girana punarujjivana abhiyana) गिरणेला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका खासदार उन्मेश पाटील यांनी घेतली असून ते गिरणा परिक्रमेचा तिसर्‍या टप्पाचा प्रवास करीत आहेत. परंतू त्यांच्या मुळ मतदार संघ असलेल्या चाळीसगावातून वाहणार्‍या डोंगरी-तितूर नदीची (Dongri-Titur river) गेल्या काही वर्षात अत्यंत दुरावस्था झाली असून अतिक्रमण व घाणीचे प्रचंड साम्रज्य झाले आहे. याचा फटका नदीला आलेल्या सहा महापुरात (flood) तालुकावासिंयाना बसला आहे. तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांच्या कार्यकाळात २०१८ मध्ये नदी संगमाला आणि नजीकच्या मस्तानी अम्मा टेकडी विकासाठी जवळपास पाच कोंटीची निधी आणला होता. परंतू ते काम देखील अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे गिरणेची परिक्रमा करणारे खासदार डोंगरी-तितूर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी परिक्रमा करणार का? असा सवाल तालुक्यातून उपस्थित केला जात आहे.

निर्सग संपन्नतेचा धनी असलेल्या पाटणादेवी डोंगरात उगम पावणार्‍या डोंगरी-तितूर नद्यांचा संगम चाळीसगाव येथे होते. या संगमावरच चाळीसगाव नगरी बसलेली आहे. परंतू गेल्या काही वर्षात या दोन्ही नदीची अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे. नदीत प्रचंड वाढलेले गवत, अवास्तव बाभूळ, मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे, नदीत नागरिकांकडून घाण टाकली जात असल्यामुळे या दोन्ही नद्या डपींग गाऊड झालेल्या असून नदीची खोली व रुदी कमी झाली आहे.

लोकप्रतिनिधीची उदासिनता व प्रशासनाने केलेली डोळेझाक, यामुळे पावसाळ्यात आलेल्या सहा महापुराचा हाहकार चाळीसगावकरांना भोगावा लागला आहे. जमिनीलगत आलेल्या रस्त्यांमुळे पुराचे पाणी रस्त्यावरून शहरात पोहोचले आणि त्याने जनावरांचा चारा, टपर्‍या वाहून नेल्या, मातीची घरे पाडली, नदीकाठचे मोठे नुकसान केले. तसेच दोन ते तीन जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. पुरामुळे चाळीसगाव तालुक्याची मोठ्या प्रमाणात आर्थिक हाणी झाली आहे. तर शेतीचे देखील प्रचंड नूकसान झाले. नदीचा उथळपणा यासाठी नदीचे खोलीकरण होणे गरजेचे होते. तसेच नदीचे पात्र मोठे व खोल होऊन, नदीच्या लेव्हलला आलेल्या रस्त्यात काही उंची तयार झाली असती आणि पुराचे पाणी थेट शहरामध्ये न जाता सरळ वाहून गेले असते. परंतू याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.

गिरणा नदीच्या प्रश्नांसह नदीवर तयार होणारा प्रस्तावित सात बलून बंधार्‍यांच्या मंजुरीसाठी खासदार उन्मेष पाटील यांनी सुरु केलेल्या गिरणा नदी परिक्रमेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. गिरणा नदीचा प्रश्न, कावेरी कॉलिंग प्रमाणे देश पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न या परिक्रमेत द्वारे केला जाणार असूनगिरणा नदी परिक्रमेचे गावोगावी उत्सुर्त स्वागत होते आहे. गिरणा परिक्रमेचा दुसरा टप्पात खासदार उन्मेश पाटील यांनी ३२ किमी पायी चालत केला, गिरणा काठाचा प्रवास जळगाव-जागोजागी गावकर्‍यांच्या सहभागाने परिक्रमेला लोकचळवळीचे आले स्वरूप दिले आहे.

परिक्रमेतून बलून बंधार्‍याची लोकजागृती होत असुन ३८० किलोमीटर गिरणा परिक्रमेचा दुसरा टप्पात ३२ किमी पायी चालत गिरणा काठाचा नुकताच प्रवास केला असून तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली आहे. गिरणा पुनरुज्जीवन अभियानातून गिरणेला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका खासदार उन्मेश पाटील यांनी मांडली आहे. परंतू खासदार उन्मेष पाटील हे चाळीसगाव तालुक्याचे आमदार असताना डोगरी-तितूर नदीची स्वच्छता लोकसभागातून केली. त्यानतंर मात्र डोंगरी-तितूर नदीच्या स्वच्छतेकडेे त्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

नदीपात्रातील अतिक्रमण काढण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात ठोस अशी भूमीक घेण्यात आली नाही, धार्तुर-मातुर कारवाईवर समाधान व्यक्त करण्यात आले. महापुर आल्यानतंर तात्पुरता स्वरुपात अतिक्रमण काढण्यात आली. परंतू आज-घडील पुन्हा तितूर व डोंगरी नदीपात्रात अतिक्रमण बोकाळले आहे. पूर्वी फक्त लोखंडी टपरींचे अतिक्रमण होते. आता लोकांनी पक्के बाधकाम करुन आरसीसी ओंटे व सेंट तयार केली आहेत. अस्वच्छतेमुळे नदीची खोली दिवसेंदिवस कमी होत आहे.

भविष्यात हे अत्यंत धोकेदायक आहेत. त्यामुळे डोंगरी-तितूर नदीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी खासदार या नदींची परिक्रमा कधी करणार अशी चर्चा आता तालुक्यातून रंगत आहे. तर गिरणा परिक्रमावर आधिच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील टिका केली असून त्यांच्या म्हणन्यानूसार खासदार केवळ प्रसिध्दीसाठी हा उद्योग तर करीत नाही ना? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

तितूर व डोंगरी नदीची विकास कामे ठप्प- शहराच्या सौंदर्यात भर पडून येथे रोजगारास चालना मिळेल या उद्देेशाने तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी तितूर नदी व डोंगरी नदी तट परिसराच्या सभोवती नदी घाट, वनोद्यान, संरक्षण भिंत व मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि नजीकच्या मस्तानी अम्मा टेकडी विकासाठी सन २०१८ मध्ये ४ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी सदर कामासाठी मंजूर करुन आणला होता. या निधीतून काही कामे झाली आहेत. तर बरीच कामे आज घडली ठप्प पडलेली आहेत. त्याबाबत काय ? असा देखील प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com