रेशनकार्डासाठी 400 रूपयांची लाच घेणार्‍या खासगी पंटरला अटक

तहसीलच्या आवारात जळगाव लाचलुचपत विभागाची कारवाई
रेशनकार्डासाठी 400 रूपयांची लाच घेणार्‍या खासगी पंटरला अटक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तहसील कार्यालयात (Tehsil Office) जुने व जीर्ण झालेले रेशनकार्ड (ration card) नवीन बनवून देण्यासाठी 400 रूपयांची लाच (bribe) घेणार्‍या तरूणाला (Private punter) जळगाव लाचलुचपत पथकाने (Bribery squad) गुरूवारी दुपारी रंगेहात पकडले (arrested) आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे जुने व जीर्ण रेशनकार्ड (ration card) झाल्याने नव्याने दुय्यम नवीन प्रत मिळण्यासाठी जळगाव तहसील कार्यालयात अर्ज घेवून गेले होते. त्याठिकाणी खासगी व्यक्ती (Private punter) पराग पुरूषोत्तम सोनवणे (वय-39) रा. खोटे नगर, जळगाव यांनी रेशनकार्डची दुय्यम प्रत हवी असेल तर 400 रूपयांची मागणी केली.

दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागात याची माहिती दिली. त्यानुसार गुरूवार 19 मे रोजी दुपारी लाचलुचपत विभागाने सापळा रचून संशयित खासगी पंटर पराग पुरूषोत्तम सोनवणे याला 400 रूपयांची लाच (bribe) घेतांना रंगेहात (arrested) पकडले आहे.

ही कारवाई पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल शैला धनगर यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com