
जळगाव - Jalgaon :
जिल्हा कारागृहातील रघुनाथ लोटू इंगळे( 59) या बंद्याचा मंगळवारी दुपारी चार वाजता गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
रघुनाथ इंगळे यांच्याविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत होता.
कारागृहात असतांना रघुनाथ इंगळे या बंद्यांची १ जानेवारी रोजी त्याची प्रकृती बिघडल्याने कारागृह प्रशासनाने त्याला साकेगाव येथील गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते .
मंगळवारी उपचार सुरू असतांना चार वाजता मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.