पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची जळगावात भेट

ओंकारेश्वर मंदिरात केली पूजा
पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची जळगावात भेट

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौभाग्यवती जशोदाबेन नरेंद्र मोदी या तीर्थयात्रेसाठी निघाल्या आहेत. त्या जळगावमध्ये आल्या असता, जशोदाबेन मोदी यांनी शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेत अभिषेक, पूजा केली.

पंतप्रधान मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या तीर्थयात्रा करीत आहेत. त्या जळगावमार्गे जात असताना सुमारे दोन तास त्या येथे थांबल्या. त्यांच्यासमवेत बहीण, भाऊ, सेवकांसह दोन सुरक्षारक्षक, पोलिसांचा ताफा होता.जशोदाबेन मोदी यांनी जळगावमधील ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी अभिषेक करीत समुद्र जल, नर्मदा जल, गंगाजलासह पुष्पबेल अर्पण केले. त्यांनी देशाच्या समृद्धीसाठी अभिषक संकल्प करीत आरती केली. मंदिर संस्थानतर्फे जशोदाबेन मोदी यांचा हार-बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना नारळफळ, प्रसाद देण्यात आला. मंदिरात सुमारे तासभर त्यांच्या हस्ते पूजा-अर्चा, अभिषेक करण्यात करण्यात आला. पूजाअर्चा झाल्यानंतर त्या तीर्थक्षेत्र पुरीकडे रवाना झाल्या. दरम्यान, मंदिर संस्थानतर्फे जुगलकिशोर जोशी, आशा जोशी यांनी त्यांचा सत्कार केला. आशिष पांडे, पंडित राघवेंद्र, प्रिन्स पांडे यांनी पौरोहित्य केले. यावेळी गोटू जोशी, अक्षय जोशी, दिलीप जोशी यांच्यासह दर्शनार्थ भाविक उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com