पोलीस असल्याची बतावणी : अग्रवाल चौकातुन सोपा विक्रेत्याची दुचाकी लांबविली

पोलीस असल्याची बतावणी : अग्रवाल चौकातुन सोपा विक्रेत्याची दुचाकी लांबविली
दुचाकी चोरी

जळगाव :- jalgaon

पोलीस असल्याची बतावणी Pretending to be police करून विश्वास संपादन करत एकाने अग्रवाल चौकातून सोपा विक्रेत्याची दुचाकी लांबविल्याची Bicycle lengthening घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात Ramanandnagar Police Station गुन्हा दाखल झाला आहे.

पिंप्राळा हुडको परिसरातील ख्वाजानगर येथील शेख आसीफ शेख मुनाफ वय ३२ हे अग्रवाल चौकात सोफासेट विक्रीचा व्यवसाय करतात. ४ डिसेंबर रोजी शेख आसीफ हे नेहमीप्रमाणे अग्रवाल चौकात सोफा सेट विक्रीच्या ठिकाणी बसलेले असताना पोलिसांसारखे कटिंग केलेला एक अनोळखी इसम आला. त्याने शेख आसिफ यांना नगर जिल्ह्यात खूपीया पोलिस असल्याचे सांगत नगर येथे आठ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी तपासासाठी जळगावात आल्याची बतावणी केली.

पाेलिस असल्याबाबतचे बनावट आयकार्डही त्याने शेख आसिफ यांना दाखविले. त्यानंतर तो याच ठिकाणी एका सोपा सेटवर झोपला. उठल्यानंतर जिल्हापेठ पोलिस स्टेशनला हजेरी लावण्यासाठी जायचे असल्याचे सांगत शेख आसिफ यांना त्यांची दुचाकी मागितली. शेख आसिफ यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्यास त्यांची एम.एच.१९ ए.वाय.८२३२ ही दुचाकी दिली. अनोळखी इसम दुचाकी घेऊन गेला त्यानंतर पुन्हा परतलाच नाही.

शेख आसीफ यांनी त्यांचा भाऊ शेख युसूफ व इतरांसोबत परिसरात तसेच शहरात इतरत्र दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आले नाही . अखेर रविवारी शेख आसीफ यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली या तक्रारीवरून त्यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी लांबविल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.