
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
पोलीस दलात (police force) उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी (Remarkable and commendable performance) केल्याबद्दल स्वातंत्र्य दिन निमित्ताने जिल्हा पोलीस दलातील पाच जणांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक (President's Police Medal) जाहीर झाले आहे. पोलीस कवायत मैदानावर होणार्या ध्वजारोहनानंतरच्या शासकीय कार्यक्रमानंतर या कर्मचार्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिसांसह सुरक्षेयंत्रणेतील वेगवेगळ्या विभागातील पदकप्राप्त अधिकारी व कर्मचार्यांची यादी दि. 14 ऑगस्ट रोजी जाहीर केली. यामध्ये जळगाव पोलीस दलातील पाच जणांना राष्ट्रपतींकडून दिले जाणारे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच विशेष सेवा प्राप्त करण्यासाठी सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान रामकृष्ण गायकवाड यांना सेवा पदक जाहीर झाले आहे.
उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी पोलीस कवायत मैदानावरील ध्वाजारोहनाच्या कार्यक्रमानंतर या सर्व पदकप्राप्त पोलीस अधिकारी, अमलदारांचा ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे
हे आहेत राष्ट्रपती पदकाचे मानकरी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार विजय देवराम पाटील, माणिक सोनाजी सपकाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुरेश पंडित पाटील व मोटार वाहन विभागाचे प्रदीप राजाराम चिरमाडे हे पाच जण पदकाचे मानकरी ठरले आहे.