महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी 
ललित गांधी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी

गव्हर्निंग कॉऊन्सीलवर जिल्ह्यातून संगिता पाटील, नितीन इंगळे, संजय दादलिका

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या व्यापार- उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून, प्रचलित असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, (Maharashtra Chamber of Commerce) इंडस्ट्रीज अ‍ॅड अ‍ॅग्रिकल्चरच्या (Industries and Agriculture) व्दिवार्षिक निवडणुकीत (Elections) अध्यक्षपदी ललित गांधी (Lalit Gandhi as President) यांची बिनविरोध (Unopposed) निवड झाली आहे. तसेच गव्हर्निंग कॉऊंन्सीलवर (Governing Council) जिल्ह्यातून संगिता पाटील (Sangita Patil,), नितीन इंगळे,(Nitin Ingle,) संजय दादलिका (Sanjay Dadalika) यांची बिनविरोध निवड (Selection) झाली आहे.

व्यापार व उद्योग क्षेत्रात गेल्या 95 वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅड अ‍ॅग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी कोल्हापूर येथील ललित गांधी तर वरिष्ट उपाध्यक्षपदी औरंगाबाद येथील उमेश दाशरथी तर गव्हर्निंग कॉऊंन्सीलवर जिल्ह्यातून संगिता पाटील, नितीन इंगळे, संजय दादलिका यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल कॅट असो.चे राज्य उपाध्यक्ष दिलीप गांधी, पुरुषोत्तम टावरी, सुरेश टाटीया यांच्यासह पदाधिकार्‍यांनी कौतुक केले.

सात लाख व्यापारी उद्योगकांची प्रतिनिधीत्व करणारी संस्था

राज्यातील 550 हून अधिक व्यापारी, औद्योगिक संघटना, 4 हजाराहून अधिक व्यापारी उद्योजक चेंबर्स संलग्नित असून, राज्यातील सात लाख व्यापारी उद्योजकांचे प्रतिनिधीत्व करणारी ही संस्था आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com