उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात टीसीआयएल कंपनीतर्फे संगणकीकरणाचे सादरीकरण

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात टीसीआयएल कंपनीतर्फे संगणकीकरणाचे सादरीकरण

जळगाव jalgaon (प्रतिनिधी)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (Poet Bahinabai Chaudhary at North Maharashtra University) एकत्रित संगणकीकरण (Computerization) करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या (Government of India) टीसीआयएल कंपनीने (TCIL Company) आपल्या प्रस्तावाचे सादरीकरण केले.

विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात टीसीआयएलच्या सह महाव्यवस्थापक श्रीमती शिखा सिंह (Mrs. Shikha Singh) यांनी कशा पध्दतीने संगणकीकरणाच्या (Computerization) एकत्रित संगणकीकरण सुविधा देता येतील याबाबतची सविस्तर माहिती दिली.

कंपनीचे अतिष बियाणी व प्रतिक बियाणी यांनी देखील या सॉफ्टवेअर विषयी माहिती दिली. कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल यांनी प्रास्ताविक केले. सहायक पूर्वलेखक जितेंद्र शिरसाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुरेखा पाटील यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com