मंगळग्रह सेवा संस्था, कृषी विभागा तर्फे क्षेत्रीय किसान गोष्टी रब्बी हंगामपूर्व कार्यशाळा

 दीडशेवर शेतकऱ्यांचा सहभाग 
प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना दादाराव जाधवर
प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना दादाराव जाधवर

अमळनेर  Amalner

येथील श्री  मंगळग्रह मंदिर (Shri Mangalgraha Mandir) येथे मंगळग्रह सेवा संस्था व  शासनाचा कृषी विभाग (Agriculture Department of Govt) यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय किसान गोष्टी (Area farmers things) व रब्बी हंगामपूर्व (Rabi pre-season program) कार्यक्रम झाला.  जागतिक पर्यावरण संवर्धन (World Environment Day) दिनाच्या पार्श्वभूमीवर हा  कार्यक्रम झाला. या प्रशिक्षण वर्गात दीडशेहून अधिक प्रगतिशील शेतकरी सहभागी झाले होते.

प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना दादाराव जाधवर
तेथे कर आपुले जुळती...

आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अर्थात 'पीएमएफएमई' योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उद्योग- व्यवसायासाठी चालना देऊन बळकटी देणे, त्याचप्रमाणे हरभरा व दादर या पिकांच्या नियोजनासंदर्भात या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  

प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना दादाराव जाधवर
VISUAL STORY : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, शेतकरी सल्ला समितीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, प्रकल्प संचालक (आत्मा) कुर्बान तडवी, ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्वाती कदम, स्मार्ट नोडल ऑफिसर श्रीकांत झांबरे, मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, मयूर कचरे, 'पीएमएफएमई' या योजनेचे जिल्हा समन्वयक समाधान पाटील, कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी, योगेश वंजारी, आर. एच. पवार, एम. जी. पवार, दिनेश पाटील, निशा सोनवणे, नलिनी पाटील, सुप्रिया पाटील, अमळनेर तालुका तंत्र व्यवस्थापक भूषण पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, प्रशासन अधिकारी भरत पाटील आदी  उपस्थित होते. 

प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना दादाराव जाधवर
VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट

जाधवर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजनामागचा हेतू सांगितला. मंगळग्रह सेवा संस्था कार्यशाळा आयोजनासाठी बहुमोल सहकार्य करीत असल्याबद्दल विशेष आभार मानले.

  डॉ. स्वाती कदम यांनी हरभरा व दादर या पिकांच्या उत्पादनवाढीसंदर्भात मार्गदर्शन केले.  समाधान पाटील यांनी योजनेचा उद्देश, लाभार्थीसाठीची पात्रता, भांडवली गुंतवणुकीचे निकष, आर्थिक मापदंड, सामायिक पायाभूत सुविधा, अर्ज करण्याची पद्धत, बचत गटांचे योगदान, बँकेसंदर्भातील अडचणींवर कशी मात करावी आदीसंदर्भात मार्गदर्शन केले.

याप्रसंगी तालुक्यातील  महिला बचत गटांच्या काही प्रतिनिधीही उपस्थित होत्या. कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी यांनी आभार मानले.

प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना दादाराव जाधवर
VISUAL STORY: होय....मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय.....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com