रस्त्यांच्या प्रश्नावरुन प्रशांत सोनवणेंची खरडपट्टी

15 डिसेंबरपर्यंत 12 रस्त्यांच्या डांबरीकरणाचे आश्वासन
रस्त्यांच्या प्रश्नावरुन प्रशांत सोनवणेंची खरडपट्टी

जळगाव jalgaon

जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत (District Planning Board) जळगाव शहरातील रस्त्यांच्या (roads in Jalgaon city) मालकीवरून (ownership) सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Works Department) अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे (Superintending Engineer Prashant Sonwane) यांची राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसेंसह ((NCP leader MLA Eknathrao Khadse)) सत्ताधारी (ruling MLAs) आमदारांनी चांगलीच खरडपट्टी काढली. आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशांत सोनवणे यांनी दि. 15 डिसेंबरपर्यंत शहरातील 12 रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करण्याचे आश्वासन देत स्वत:चा बचाव केला.

रस्त्यांच्या प्रश्नावरुन प्रशांत सोनवणेंची खरडपट्टी
खडसेंच्या मुलाचे काय झाले? हा संशोधनाचा विषय

जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, डी-मार्ट ते इच्छादेवी चौफुली हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे? याचे उत्तर कुणीही देत नाही. मनपा, जिल्हाधिकारी, महामार्ग विभाग, बांधकाम विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवितात. या रस्त्याचे पितृत्व कुणाकडे? याचे उत्तर मिळाले पाहिजे असे खडसेंनी सांगत मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

रस्त्यांच्या प्रश्नावरुन प्रशांत सोनवणेंची खरडपट्टी
Photos # ...तर यावलमध्ये हिवाळ्यात जाणवणार कृत्रीम पाणीटंचाई
रस्त्यांच्या प्रश्नावरुन प्रशांत सोनवणेंची खरडपट्टी
बी ग्रेड तुपाचे उत्पादनास दूध संघाला परवानगीच नाही!

आमदार भोळेही झाले आक्रमक

जळगाव शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनीही आक्रमक भूमिका घेत महापालिका आणि बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना धारेवर धरले. राज्य शासन मोठ्या प्रमाणावर निधी देते. पण महापालिका आणि यंत्रणांकडून निधी देखिल खर्च केला जात नाही. मग पालकमंत्र्यांच्या नावाने ओरड होते. सरकारची बदनामी केली जाते. मनपाने केवळ कर वसूली करायची आणि सुविधा द्यायच्या नाही हा कुठला न्याय आहे? अशा शब्दात आ. भोळेंनी संताप व्यक्त केला.

रस्त्यांच्या प्रश्नावरुन प्रशांत सोनवणेंची खरडपट्टी
570 कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

सोनवणेंनी दिले आश्वासन

डी-मार्ट ते इच्छादेवी हा रस्ता बांधकाम विभागाकडून तयार केला जाणार असून त्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. तसेच शहरातील 12 रस्ते निश्चीत करण्यात आले असून दि. 15 डिसेंबरपर्यंत हे 12 रस्ते डांबरीकरण करून पूर्ण करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी दिले.

मंत्री गिरीश महाजनांचीही नाराजी

जळगाव शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही बांधकाम विभागासह मनपाविषयी नाराजी व्यक्त केली. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता राखली जात नसेल तर कामे करूनही उपयोग नाही असे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com