कविता मनात फुललेल्या प्राजक्ताचा झाला सत्कार

कविता मनात फुललेल्या प्राजक्ताचा झाला सत्कार
प्राजक्ता फेगडे हिचा सत्कार करताना संजय महाराज ,जितेंद्र महाराज, किसन फेगडे व अन्य छायाचित्र - ललित फिरके

न्हावी. Nhāvī ता. यावल| वार्ताहर-

येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील (Bharat Vidyalaya and Junior College) माजी विद्यार्थिनी (former student) प्राजक्ता राजेंद्र फेगडे (Prajakta Rajendra Phagde) लिखित कविता मनात फुलली (The poem blossomed in my mind) या कवितासंग्रहाचे (Anthology) प्रकाशन रावेर येथे गझल वैदर्भीय संमेलनात(Ghazal at Vaidarbhiya Sammelan) करण्यात आले .त्याबद्दल तिचा सत्कार (felicitated) करण्यात आला

शाळेच्या मुख्याध्यापिका तीलोत्तमा चौधरी यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केला. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका पुष्पा चोपडे, पर्यवेक्षक एन एन अजल सोंडे, सर्व शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

त्याच प्रकारे नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गझल कट्ट्यात गझल सादरीकरणाची संधी मिळाल्याबद्दल येथील विठ्ठल मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने झालेल्या कीर्तन समारंभात ह भ प संजय महाराज सुसरी कर व ह भ प जितेंद्र महाराज यांच्याकडून प्राजक्ता फेगडे चा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी मंदिराचे सेक्रेटरी विलास भोगे ,ट्रस्टी रामा पाचपांडे ,सुरेश भोगे, किसन फेगडे यांच्यासह गावकरी व भाविक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com