प्रगती विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

 प्रगती विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

 सावखेडा Sawkheda ता.रावेर

रोझोदा (Rozoda) येथील प्रगती विद्यालयात (Pragati Vidyalaya) सन १९९४-९५ या वर्षीच्या विद्यार्थ्यांचा (students) स्नेह मेळावा (friendly gathering) नुकताच झाला.कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी (Teachers Non-Teaching Staff) तसेच सर्व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि १९९४-९५ बॅचचे सर्व विद्यार्थी (Student Co-Family) सहकुटुंब सहपरिवार (present) उपस्थित होते.

मेळाव्याचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त शिक्षिका  ललिता एम. नेमाडे यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पुजनाने व दिप प्रज्वलाने झाली.यानंतर सर्व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा परिचय करून शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून मनोगत व्यक्त केले. ए. एस. किरंगे सरांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ललिता एम. नेमाडे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी इयत्ता १० वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बँकेतील ठेव रक्कम ५००१ रुपयाचे व्याज बक्षिस म्हणून जाहीर केले. सुत्रसंचालन माजी विद्यार्थी व प्रगती विद्यालयाचे उपशिक्षक संतोष धांडे यांनी तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी र. न. मेहता, पर्यवेक्षक हेमंत धांडे यांनी केले. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com