अनधिकृत वीज कनेक्शन तोडल्या प्रकरणी वीज कर्मचाऱ्यांला मारहाण

अनधिकृत वीज कनेक्शन तोडल्या प्रकरणी वीज कर्मचाऱ्यांला मारहाण

रावेर Raver|प्रतिनिधी-

अनधिकृत वीज कनेक्शन (Unauthorized power connection) तोडल्या प्रकरणी वीज कर्मचाऱ्यास (power worker) मारहाण (Beating) झाली असून, रावेर पोलिसात (Raver police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,येथील वीज कर्मचारी सतीश सांगळे रा.भोर स्टेशन यांनी मनोज दत्तात्रय पाटील (रा.भगवती नगर) यांचे अनाधिकृत वीज कनेक्शन तोडल्याने,कल्पेश पाटील यांच्या फोनवर शिवीगाळ व दमबाजी केली,याबाबत सांगळे व कल्पेश पाटील दोन्ही शनिवारी सायंकाळी ५.३० वा.विचारपूस करण्यासाठी छोरिया मार्केटमध्ये श्रीहरी फर्टिलायझर या दुकानावर विचारणा करण्यासाठी गेले असता,मनोज पाटील यांनी शिवीगाळ,दमबाजी करत चापटा बुक्यांनी तोडांवर,नाकावर,छातीवर मारहाण केली.

शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन सांगळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील पो.नि.कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शितलकुमार नाईक करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com