वीज ग्राहकांनो सावधान, तर... वीजपुरवठा होणार खंडीत

सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे निर्देश
वीज ग्राहकांनो सावधान, तर... वीजपुरवठा होणार खंडीत

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ग्राहकांना (customers) अखंडित वीजपुरवठा (Uninterrupted power supply) करणारी महावितरण (MSEDCL) आर्थिक संकटात (financial crisis) आहे. त्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा (Payment of electricity bills) करून वीजग्राहकांनी सहकार्य करावे. अन्यथा बिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा (power supply) तात्काळ खंडित (interrupted) करावा, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक (Joint Managing Director, Konkan Regional Division, MSEDCL) चंद्रकांत डांगे (Chandrakant Dange) यांनी दिले आहेत.

डांगे यांनी जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलाची आढावा बैठक (Review meeting) मंगळवारी घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार व नंदुरबार मंडलाचे अनिल बोरसे आदी उपस्थित होते.

यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डांगे म्हणाले की, ना नफा, ना तोटा तत्वाने वीजसेवा देणार्‍या महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे सद्यस्थितीत करोडो रुपयांचे दायित्व आहे. दुसरीकडे महावितरणच्या वीजग्राहकांकडे थकबाकीचा (Arrears) मोठा डोंगर आहे. या गंभीर आर्थिक संकटामुळे (financial crisis) महावितरणच्या अस्तित्वाचा सध्या बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. वीज ही मूलभूत गरज असतानाही ग्राहक इतर अनेक सेवांचे पैसे देतात. मात्र, मूलभूत गरज असलेल्या विजेचे बिल भरत (Payment of electricity bills) नाहीत. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी दिले. ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल अचूक व वेळेत देण्यासाठी मीटर एजन्सी (Meter agency) नेमण्यात आलेल्या आहेत. या एजन्सींना मीटर रीडिंग घेताना फोटोंचा दर्जा सुधारण्यास व अचूक काम करण्यास सांगितले आहे. मात्र कार्यक्षमता न सुधारल्यास संबंधित मीटर रीडिंग एजन्सींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी विविध विषयाचा आढावा घेऊन या महिन्यात वीजबिल वसुलीसह ग्राहकसेवा आणखी गतिमानतेने करण्याचे आवाहन केले. बैठकीला जळगाव परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, जळगाव मंडलातील सर्व उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, अधिकारी व मीटर रीडिंग एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com