रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते!

रस्त्यातील खड्डे त्वरित न बुजविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा भाजपचा इशारा
रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था (Very poor condition of roads) झाली आहे. रस्त्यात खड्डे की, (Potholes in the road) खड्ड्यात रस्ते (roads in the pit! )अशी अवस्था निर्माण झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे बुजवावे. खड्डे त्वरीत न बुजविल्यास (potholes are not filled quickly) तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपतर्फे (BJP) आयुक्त डॉ.विद्या गायकवाड (Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे. यावेळी शहर अभियंता एम.जी.गिरगावकर देखील उपस्थित होते.

जळगाव शहराच्या रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे शहरातील रस्त्यांची कामे हावू शकली नाहीत. परिणामी, शहरात सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून खड्ड्यांमध्ये अक्षरशः डबके साचलेले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाणदेखील वाढून साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

प्रशासनाने जळगावकरांना तात्पुरता दिलासा म्हणून, वेस्ट मटेरियल किंवा मुरुम टाकून रस्त्यांची दुरुस्ती करावी. प्रशासनाने गांभिर्यपुर्वक दखल घेवून शहरातील रस्त्यांमध्ये असलेले खड्डे त्वरीत न बुजविल्यास, तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे.

यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, डॉ.राधेश्याम चौधरी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, अ‍ॅड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, महेश चौधरी, सुरेश सोनवणे, मयूर कापसे, जितेंद्र मराठे, अतुल बारी, विजय पाटील, विजय वानखेडे, शक्ती महाजन, रेखा पाटील, लता बाविस्कर, मोहम्मद नूर, प्रकाश पंडित, गणेश माळी, शालू जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

खड्ड्यांमुळे जळगावकर त्रस्त

शहरातील मुख्य रस्त्यांसह अन्य रस्त्यांमध्ये मोठ-मोठे खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे जळगावकर त्रस्त झाले आहेत. रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असतांनाही प्रशासन लक्ष का देत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. रस्त्यातील खड्डयांमुळे अनेकांना मणक्याचे आजारदेखील बळावले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com