
जळगाव: jalgaon
कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमिवर राज्य शासनाने ऑङ्गलाईन महासभा घेण्यास मनाई केली असली तरी ऑनलाईन महासभेला (Online General Assembly) परवानगी होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर उद्या दि. १५ रोजी मनपाची महासभा प्रथमच सभागृहात ऑङ्गलाईन (Of line General Assembly) होणार आहे. दरम्यान, मनपाच्या १९९१-९२ आणि १९९७-९८ भरतीच्या लेखापरीक्षणावरुन (audit report) महासभा गाजण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता मनपाच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. तत्कानीन जळगाव नगरपालिकेने १९९१-९२ आणि १९९७-९८ मध्ये भरती प्रक्रिया राबविली होती. या भरतीप्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आल्याने विशेष लेक्षा परीक्षण करण्यात आले होते. या लेखा परीक्षण अहवालाची माहिती देण्यासंदर्भात १२ ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाईन महासभा झाली होती. मात्र, हा विषय तहकूब करण्यात आला होता.
हाच विषय पटलावर घेण्यात आला असून, यावर महासभा गाजण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील स्वच्छतागृहे बिओटी तत्वावर चालविण्याच्या धोरणात्मक निर्णयावर चर्चा होणार आहे. महापालिकेचे मुदत संपलेले व्यापारी संकुलातील गाळ्यांचे हस्तांतरण शुल्क ठरविण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल.
२०१८ ते १९ व २०२०-२१ पर्यंत दुहेरी नोंद लेखे करण्यात आले असून, महासभेच्या पटलावर अवलोकनार्थ ठेवून चर्चा केली जाणार आहे. एमआयडीसीतील कार्यरत असलेला मनपाचा डिझेल पंप, टि.बी. हॉस्पिटलमध्ये वाहनतळावर स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यासह जवळपास ७० अशासकीय प्रस्तावांवर देखील महासभेत चर्चा केली जाणार आहे.