
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेत (Jalgaon Municipal Corporation) परस्पर विरोधी दाखल (Conflicting) करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या अपात्रतेच्या (disqualification of corporators) याचिकेवर (petition) विभागीय आयुक्तांकडे (Divisional Commissioner) तर गटनेते पदाच्या (post of group leader) याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad bench) उद्या दि. 5 रोजी कामकाज होणार आहे. दोन्ही याचिकेवर निर्णयाची शक्यता असून, याकडे आता लक्ष लागले आहे.
महानगरपालिकेत अडीच वर्ष भाजपची सत्ता होती. मात्र, मार्च 2021 मध्ये भाजपच्या 57 नगरसेकांपैकी 27 नगरसेवकांनी बंडखोरी करुन शिवसेनेला पाठींबा दिला. त्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. दरम्यान, महापौर निवडीत भाजपने बजावलल्या व्हीपचे उल्लंघन केले. त्यामुळे बंडखोरी करणार्या 27 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात भाजपतर्फे विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. तर दुसरीकडे प्रभाग समिती निवडीदरम्यान, बंडखोर नगरसेवक गटातर्फे भाजपच्या 27 नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आले होते.
भाजपच्या 27 नगरसेवकांनी व्हीपचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन बंडखोर नगरसेवक गटाचे अॅड. दिलीप पोकळे यांनी याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवर उद्या दि. 5 रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार असून, भाजपच्या 27 आणि 27 बंडखोर नगरसेवक सुनावणीला हजर राहणार असून, त्यांच्याकडून जबाब नोंदविण्यात येणार आहे.
गटनेते पदाच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी
भाजपच्या 27 बंडखोर नगरसेवकांनी बैठक घेवून अॅड.दिलीप पोकळे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीच्या विरोधात भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून, यावर उद्या दि. 5 रोजी कामकाज होणार आहे.