Breaking News चार बिघे शेतात अफूची लागवड ; पोलिसांचा खडा पहारा

Breaking News चार बिघे शेतात अफूची लागवड ; पोलिसांचा खडा पहारा

चोपडा - chopada

चोपडा तालुक्यातील घोडगाव शिवारात वाळकी येथील शेतकऱ्याने (Farmers) चक्क मक्याच्या शेतात सुमारे चार बिगे अफूची (Opium) लागवड केली असून या शेतीवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा ग्रामीण (police) पोलिसांनी काल दि.३ रोजी सायंकाळी धाड टाकली, मात्री रात्रीची वेळ अंधार असल्याने आज सकाळपासून पोलीस कारवाई सुरू आहे. अफूच्या शेतीची सर्वात मोठी लागवड व पोलीस कारवाई होत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लागवड केलेल्या अफूची किंमत कोट्यावधींच्या घरात असून ही लागवड आजूबाजूला मका लागवड करून त्यामधोमध अफूची लागवड केली आहे.

पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.नि.देविदास कुनगर व त्यांच्या टिमने छापा टाकून कारवाई करण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांनी सुध्दा घटनास्थळी पोहचले आहेत.

या शेतकऱ्याने केली लागवड

चोपडा तालुक्यातील घोडगाव शिवारात प्रकाश सुधाकर पाटील (रा.वाळकी, ता.चोपडा) यांचे शेत गट नं.४३१/२ व त्याची मयत आई यांचे नावे असलेले शेत गट क्र.४३१/१ मध्ये मानवी शरिरास अपायकारक व प्रतिबंधित गुंगी येणारे अफू पिकाची लागवड केली असल्याची माहिती पो.नि. देविदास कुनगर चोपडा ग्रा.पो.स्टे. यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com