जिल्हा बँकेसाठी रावेरात सोसायटी मतदार संघात १०० टक्के मतदान

इतर मतदार संघात २४६ पैकी २२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हा बँकेसाठी रावेरात सोसायटी मतदार संघात १०० टक्के मतदान
मतदानाचा हक्क बाजावतांना माजी आमदार अरुण पाटील

रावेर|प्रतिनिधी raver

येथे सोसायटी मतदार संघातील दोन उमेदवारांनी माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा दिला असला तरी शेवटपर्यंत निवडणुकीत उत्कंठा कायम होती. सरळ वाटणाऱ्या निवडणूकित शेवटपर्यंत माजी आमदार अरुण पाटील यांच्या गटाला धाकधुक वाटत असली तरी एक्झिट पोल नुसार अरुण पाटील यांचा विजयी निश्चित मानला जात आहे.

दरम्यान येथील कमलाबाई गर्ल्स हायस्कुलमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर झालेल्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातील एकूण ५४ पैकी ५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.तर इतर संस्था मतदार संघातून २४६ पैकी २२८ जणांनी मतदान केले.या ठिकाणी माजी आमदार तथा उमेदवार अरुण पाटील दिवसभर उपस्थित होते,तर माजी मंत्री एकनाथ खडसे,गुलाबराव देवकर,इतर संस्था संघातील उमेदवार रवींद्र पाटील यांनी भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

माजी जिल्हा बँक संचालक नंदू महाजन,भाजप नेते सुरेश धनके, किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,भाजयुवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी,बाजार समितीचे माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,राज कन्स्ट्रक्शनचे राजेंद्र चौधरी,माजी जिप सदस्य रमेश पाटील,सावदा नगरसेवक राजेश वानखेडे,कृउबा सभापती गोपाळ नेमाडे,भाजप तालुकाध्यक्ष राजन लासुरकर,जिप सदस्य कैंलास सरोदे,शिवाजी पाटील,दिलीप पाटील,अरविंद पाटील,विवरा माजी सरपंच यादवराव पाटील,शेतकी संघाचे चेअरमन पी आर पाटील,आत्माराम कोळी यांच्यासह तालुक्यातील मातब्बर याठिकाणी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com