
मनोहर कांडेकर
चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी
शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी health of citizens व चाळीसगाव chalsigaon तालुका कोरोनामुक्त Corona free करण्यासाठी चाळीसगावच्या इतिहासात पहिल्यादाच राजकिय लसीकरणाला सुरुवात झाली आहे. चाळीसगावकरांसाठी ही आनंदाची बाब असून यापुढे देखील नागरिकांच्या आरोग्यासाठी व विकासासाठी चाळीसगावच्या तिन्ही दादांनी अशीच राजकिय प्रतिस्पर्धा करावी अशी अपेक्षा चाळीसगावकरांची आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे दि.४ रोजी एकाच दिवसात एकाच ठिकाणी घेतलेल्या जम्बो लसीकरण शिबिरात २००० नागरिकांचे लसीकरण करण्याचा रेकॉर्ड केला गेला. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून लसीकरणापासून वंचित असणार्या हजारो नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळाल्याने चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी हे शिबीर बूस्टर डोसच ठरल्याची प्रतिक्रिया शहरातून येत होती.
तर खासदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून धुळे रोड येथील मनुश्री मेडिकल परिसरात सौरव पाटील मित्र मंडळाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आबालवृद्ध, ज्येष्ठ-श्रेष्ठ, तरुण-तरुणी विद्यार्थी यांना शेकडो कोविशिल्ड लसीकरणाचा डोस उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील हा प्रभाग पहिला शंभर टक्के लस युक्त, कोरोनामुक्त प्रभाग ठरणार आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा बुधवार व गुरुवार असे दोन दिवसीय ६ हजार कोविशील्ड लसीचे नियाजन असलेले लसीकरण शिबीर राबविण्यात येणार आहे. तर माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पाठपुराव्या महाराष्ट्र शासन व राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे आज(बुधवारी) शहातील राजपूत मंगल कार्यालयात दोन हजार लसीकरणाचे नियोेजन असलेले लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तर खासदार उन्मेेष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी शहरातील वैभव मंगल कार्यालय येथे पुन्हा लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार उन्मेष पाटील, आमदार मगेश चव्हाण व माजी आमदार राजीव देशमुख हे चाळीसगावकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरणासाठी सरवाल्याने चाळीसगावकरणासाठी ही समाधानाची बाब आहे. लसीकरण शिबीरामध्ये जरी ‘राजकिय औषधा ’चा वास येत असला, तरी देखली तो चाळीसगावकरांच्या आरोग्यासाठी बुस्टर डोस आहे.
तिन्ही दादा ज्या पद्धतीने लसीकरणासाठी पुढे आलेत, त्याच पद्धतीने चाळीसगाव शहर खड्डेमुक्त व धुळमुक्त करण्यासाठी व इतर विकासकामांसाठी पुढे आले असते, तर आज शहराचे चित्र वेगळे राहिले असते. त्यामुळे भविष्यात चाळीसगावच्या विकासात्मक राजकरणासाठी या तिघांनी लसीकरणाच्या शिबीरासारखीच प्रतिस्पर्धा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.