यावल तालुक्यात राजकीय भूकंप ?

हालचाली गतीमान ?
यावल तालुक्यात राजकीय भूकंप ?

यावल Yaval । प्रतिनिधी

एका राजकीय पक्षाच्या (Political party) तिकीटावर निवडून (selecting on the ticket )आलेल्या पदाधिकार्‍यांनी (Officials) आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा (post and party membership) राजीनामा (Resignation) त्यांच्या तालुका अध्यक्षांकडे (Taluka President) दिल्यामुळे यावल तालुक्यात एक मोठा भूकंप (Political earthquake) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

गेल्या काही दिवसापासून या पक्षामध्ये धुसफूस सुरू असून एका पदाधिकार्‍याने आपण पक्षाचे पाईक आहोत पक्षाने सांगितलेले काम पूर्ण केलीत त्यासोबत मतदारांचे अडीअडचणीसाठी धावून गेलो पक्षाने मला मान सन्मान दिला पक्षामुळे माझी ओळख चांगली झाली मात्र काही अपरिहार्य कारणास्तव पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा तालुका अध्यक्ष यांच्याकडे देत आहे असे तालुकाध्यक्ष यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विशेष म्हणजे तालुकाध्यक्षांनी व काही पदाधिकार्‍यांनी या पदाधिकार्‍याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दि.29 रोजी झालेल्या चर्चेत निष्फळ ठरले यासाठी वरिष्ठ स्तरावर चेंडू फेकला गेला असून वरिष्ठांनी एक-दोन दिवसात याबाबत निर्णय घेणार असल्यामुळे नेमका आता तालुक्यात काय राजकीय भूकंप होतो का शमवली जाते याकडे लक्ष लागले आहे.

राजकीय हालचाली गतीमान ?

एका राजकीय पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा त्यांच्या तालुका अध्यक्षांकडे दिल्यामुळे यावल तालुक्यात एक मोठा भूकंप होण्याची शक्यता असे दैनिक देशदूत मधून प्रसिद्ध झाल्याने तालुक्यात हालचाली गतिमान झाल्या असून चर्चेला उधान आले आहे . नेमका पदाधिकारी कोण ?व कोणत्या पक्षाचा ही दिवसभर चर्चा तालुका भर सुरू असून याबाबत नेमकी भूमिका संबंधित पदाधिकारी आज स्पष्ट करणार असल्याचे समजते

सदर राजीनामा देणारी पदाधिकारी व्यक्ती आज त्यांच्या राजीनामा मंजुरी संदर्भात संबंधीतांना विचारणा करून दोन दिवसात आपला योग्य तो निर्णय घेणार असल्यामुळे नेमकं आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जाते हे समोर दिसेल च .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com