सप्ताह घडामोडी : गुन्हेगारी रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी!

सप्ताह घडामोडी : गुन्हेगारी रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी!

शहरात घडणार्‍या घटनांमुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कायदा व सुवस्थेचे वाभाडे निघालेले आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये जळगाव शहरात एका पाठोपाठ चार खूनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यातच जळगावात गुन्हेगारीचे प्रमाणात दिवसागणिक वाढ होत असल्यामुळे पोलीस यंत्रणा वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. जळगावात पुर्वीपासूनच जातीय दंगल, गँगवॉर, हत्याकांड, सेक्स स्कँडल किंवा खंडणी अशा घटनांमुळे चर्चेत राहिले आहे. सण, उत्सवांच्या काळात जातीय दंगलीचे प्रमाण आता कमी झाल्यामुळे जातीय तेढ कमी होवू लागला आहे. मात्र खुनासह टोळी युद्धांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे निघू लागले आहे. गेल्या महिन्यात एकाच दिवशी 24 तासांच्या अंतराने अनैतिक संबंधातून दोन तरुणांच्या खूनाची घटनांनी शहर हादरुन गेले होते.

या घटना शांत होत नाही तोच गेल्या आठवड्यात पुन्हा पुर्ववैमन्यास्यातून तरुणावर चॉपरने वार करुन त्याचा खून झाला होता. या घटनेला आठवडा उलटत नाही तोवर पुन्हा शनिवारी चेहर्‍यावर धारदार शस्त्राने वार करीत डोक्यात दगड टाकून तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली. नेहमी गर्दीने गजबजलेला मेहरुण तलाव परिसरात भरदिवसा खूनाची घटना घडते आणि चोवीस तास उलटून देखील पोलिसांना खूनाचे कारण स्पष्ट होत नसल्याने हे पोलिसांचे अपयश म्हणणे वावगे ठरणार नाही.

वाढत्या गुन्हेगारीमुळे जळगावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे जळगावची वाटचाल बिहारच्या दिशेने होवू लागली असून जिल्ह्यात अशीच कायदा व सुव्सथेची अशीच परिस्थिती राहिल्यास जळगाव जिल्ह्याचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही यात शंकाच घेण्याचे कारण नाही.

Related Stories

No stories found.