जळगावात दोन हॉटेल्सवर पोलिसांची धाड

13 जोडप्यांना रंगेहाथ अटक
जळगावात दोन हॉटेल्सवर पोलिसांची धाड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या (MIDC Police Station) हद्दीतील दोन हॉटेल्सवर (two hotels) गुरुवारी डीवायएसपींच्या पथकाने (DySP) धाड (raided) टाकली. या कारवाईत 13 जोडप्यांना रंगेहाथ अटक (Couples arrested red-handed) करण्यात आली आहे. त्यांच्यासह हॉटेल, लॉज मालकांसह दलालांना (brokers including hotel, lodge owners) पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा(crime) दाखल करण्याचे काम सुरु होते.

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल व लॉजमध्ये अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने एकाचवेळी दोन्ही ठिकाणावरील हॉटेलवर धाड टाकली. यात एका हॉटेलमधून तीन जोडपी तर दुसर्‍या ठिकाणाहून 9 जोडपी असा एकूण 13 जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

परप्रांतीय तरुणींचा समावेश

हॉटेलमधील लॉजवर टाकण्यात आलेल्या धाडीत ताब्यात घेण्यात आलेल्या मुली हा शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आहेत. याठिकाणी त्या स्थायिक झाल्या असून त्यातील बहुतांश मुली या परप्रांतीय असल्याचे उघडकीस आले आहे.

दलालाकडून पुरविल्या जात होत्या मुली

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका ठिकाणी दलालाच्या माध्यमातून मुली पुरविल्या जात असल्याचे उघड झाले आहे. तर काही तरुणी या स्वत:च्या मर्जीने आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com