मदत मागण्यासाठी आलेल्या मयताच्या कुटुंबियांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मृतदेह थेट दूध संघाच्या आवारात ठेवत केली विटंबना; दूध संघाची तुटपूंजी मदत नाकारली
मदत मागण्यासाठी आलेल्या मयताच्या कुटुंबियांवर पोलिसांचा लाठीचार्ज

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघात (Jilha duha sangha) काम करणार्‍या कर्मचारी (Staff) धनराज सुरेश बिरारी (वय-37, रा. शिवाजीनगर) यांचा मुक्ताईनगरजवळ अपघातात मृत्यू (Death by accident) झाला. मयताच्या कुटुंबियाला आर्थीक मदत (Financial aid) मिळावी यासाठी मृतदेह थेट दूध संघाच्या आवारात आणला. पाच तास उलटून देखील कुठलेही मदतीसाठी समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह (Corpses) थेट दूध संघाच्या आवारात ठेवला. यावेळी पोलिसांकडून मयताच्या (Police lathi charge) कुटुंबियांवर लाठीचार्ज करण्यात करण्यात आला. यावेळी मृतदेहाची विटंबना देखील करण्यात आली.

दूध वाहून नेणार्‍या टँकर बंद पडल्याने दूसर्‍या टँकरमध्ये दूध भरत असतांना त्या टँकरला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना मुक्ताईनगर जवळ आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात जिल्हा दूध संघातील प्रोसेसिंग विभागातील कर्मचारी धनराज बिरारी धुळे येथील चार जण जागीच ठार झाले. मयत धनराज यांच्या कुटुंबियांना आर्थीक मदत मिळावी यासाठी दूध संघातील कर्मचार्‍यांसह नातेवाईकांनी सायंकाळी साडेपाच वाजेपासून आंदोलन केले. दरम्यान, मुक्ताईनगर येथून मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह थेट जिल्हा दूध संघात सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा दूध संघाच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले.

तोडगा न निघाल्याने कर्मचारी आक्रमक

नातेवाईक आंदोलन करीत असतांना पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी मयताच्या नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी दूध संघ व मयताच्या नातेवाईकांमध्ये मध्यस्तीची भूमिका बजावित त्यांना जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्याकडे घेवून गेले. परंतु तब्बल तीन तास चर्चा करुनही त्यावर तोगडा न निघाल्याने कर्मचार्‍यांसह नातेवाईक आक्रमक होवून त्यांचा संताप अनावर झाला.

पोलिसांनी जबरदस्ती

रवाना केला मृतदेह

मृतदेह दूध संघाच्या आवारात आणत मृतदेहाची शेवटच्या क्षणी देखील विटंबना करण्यात आली. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांनी जबरदस्ती मृतदेह रुग्णावाहिकेत ठेवून मयताच्या घरी रवाना केला.

तगडा बंदोबस्त असूनही

मृतदेहाची विटंबना

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनाने शहरातील शहर, शनिपेठ, रामानंद, एमआयडीसी व तालुका पोलीस ठाणे याठिकाणाहून बंदोबस्त मागविला होता. मात्र तरी देखील पोलिसांसह कर्मचार्‍यांकडून मृतदेहाची विटंबना झाली.

एका जीवाची किंमत केवळ 50 हजारच का?

दूध संघाचे कर्मचारी धनराज सोनार यांची गुरुवारी सेकंट शिफ्ट होती. त्यानंतर ते घरी गेले परंतु दूध संघातील अधिकार्‍याने कर्मचारी कमी असल्याचे सांगून त्यांना घरुन बोलावून घेतले. ड्युटीवर असतांनाच त्यांचा अपघात झाल्याने दूध संघाने भरपाई द्यावी अशी मागणी केली. परंतु दूध संघाकडून केवळ पन्नास हजारांची मदत व मयताच्या पत्नीला कंत्राटपद्धीने नोकरी देवू असे सांगितले. परंतू कुटुंबियांनी त्यांची मदत घेण्यास नकार दिला. यावेळी कुटुंबियांनी एका जीवाची मदत केवळ 50 हजार रुपयेच का? असे म्हणत दूध संघाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध केला.

रुग्णावहिकेतून मृतदेह काढताच लाठीचार्ज

पाच तास उलटून देखील दूध संघाकडून मदत न मिळाल्याने कुटुंबिय मृतदेह माघारी घेवून जात होते. यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईकांसह कर्मचार्‍यांनी मृतदेह रुग्णावाहीकेतून बाहेर काढत थेट गेटवरुन आत घेवून जात होते. यावेळी संतप्त कर्मचार्‍यासह नातेवाईकांनी दूध संघाचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करताच पोलिसांकडून त्यांच्यावर बेछूट लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे परिसरात पळापळ होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Stories

No stories found.