भुसावळात पोलिसांनी राबवले कोंबिंग ऑपरेशन

71 जणांना समन्स तर 25 वॉरंट बजावले : 49 वाहने तर 7 मद्यपी चालकांवर कारवाई
भुसावळात पोलिसांनी राबवले कोंबिंग ऑपरेशन

भुसावळ । प्रतिनिधी

उपविभागातील विविध प्रकारच्या संशयित गुन्हेमार, व आरोपींपवर जरब बसविण्यच्या उद्देशयाने डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे (Dysp Somnath Waghchore) यांच्या मार्गदर्शनाखाली 21 रोजी रात्री 10 ते 22 रोजी पहाटे 4 वाजेदरम्यान कोम्बिग ऑबरेशन (combing operation) राबविण्यात आले. यात 24 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, 71 जणांना समन्स तर 25 जणांना बेलेबर वारंट बजावण्यात आले याशिवातय वाहनांची तपासणी करुन अवैध धंद्यांवर ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ उपविभागातील चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली. तसेच शहर वाहतूक शाखेतफेर ही कोम्बिग ऑपरेशन राबवण्यात आले. यात 71 व्यक्तींना समन्स बजावण्यात आले.

चारही पोलीस स्टेशन हद्दीतील 25 व्यक्तींना बेलेबल वॉरंट बजावण्यात आले. सात व्यक्तींना अटक वॉरंटची बजावण्यात आले. शहरातील 24 हिस्ट्री सिटर्स गुन्हेगार (History sitters criminals) चेक करण्यात आले. दारूच्या चार अड्ड्यांवर रेड त्याचप्रमाणे दोन जुगार रेड करण्यात आल्या. शहरातील 12 हॉटेल, लॉज तपासण्यात आल्या.

शहरातील गांधी पुतळा, नाहाटा चौफुली व भुसावळ तालुका हद्दीतील कुर्‍हा येथे नाकाबंदी लावण्यात आलेली होती. या नाकाबंदी दरम्यान सुमारे 300 च्या वर वाहनांची तपासणी करण्यात आली व त्यामध्ये 49 वाहनांवर मोटर वाहन कायदा खाली कारवाई करण्यात आली. दारू पिऊन वाहन चालवणार्‍या 7 वाहन चालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या (Drunk and drive) केसेस करण्यात आल्या. घरफोडी, जबरी चोरी, चोरी यासारख्या गुन्ह्यातील 20 आरोपी तापासण्यात आले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. नि. गजानन पडघन, पो.नि. राहुल गायकवाड, पो.नि. विलास शेंडे, एपीआय मोरे, एपीआय श्री. नाईक, एपीआय प्रकाश वानखेडे, एपीआय अमोल पवार, एपीआय हरिश भोये,पीएसआय श्री. पाथरवट यांनी व त्या-त्या पोलीस स्टेशनच्या स्टाफने कारवाई केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com