भुसावळात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

भुसावळात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

आगामी काळात सुरू होणारा श्रावण मास त्यादरम्यान येणारे विविध सण, गणपती उत्सव, (Various festivals, Ganapati festival) मोहरम उत्सव हे सण शांततेमध्ये व उत्साहाच्या वातावरणात साजरे करण्यात यावे व्हावे यासाठी भुसावळ उपविभागांमध्ये (Bhusawal Subdivisions) पोलीस विभागाच्या (Police Department) वतीने 22 रोजी सायंकाय ते 23 रोजी पहाटेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन (Combing operation) राबवण्यात आले.

सदरच्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये विविध कारवाया करण्यात आल्या त्यात अटक वॉरंट बजावणी, न्यायालयाने विविध गुन्ह्यातील फरार व्यक्तींना पकडण्यासाठी काढलेल्या चार व्यक्तींना अटक वॉरंट बजावणी करण्यात आली.

बेलेबल वॉरंट बजावणी 11, समन्स बजावणी 35, अवैध दारू धंद्यांवर रेड 9. भुसावळ शहर बाजारपेठ त्याचप्रमाणे तालुका हद्दीत विविध ठिकाणी दारू धंद्यांवर 9 रेड करून 9 गुन्हे दाखल करण्यात आले. जुगार रेड चार ठिकाणी जुगार रेड करून चार गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायदा 122 रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणार्‍या एकूण चार इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 खाली पुन्हा दाखल करण्यात आले. तंबाखू व तंबाखूजन्य प्रतिबंधक पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई, तंबाखू व इतर तंबाखूजन्य प्रतिबंधक पदार्थ शालेय परिसरामध्ये विक्री करणार्‍या 11 पान टपरी चालवणार्‍या. व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शस्त्र अधिनियम कलम 4/ 25 - अवैध तलवार बाळगणार्‍या एका व्यक्तींवर शस्त्र अधिनियम कलम 4/25 खाली पुन्हा दाखल करण्यात आला. विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाईत 1 वाहनांवर कारवाई करण्यात आली.

शहर वाहतूक शाखेकडून ड्रंक अँड ड्राईव्हच्या सहा केसेस करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 102 /117 खाली 7 कारवाया करण्यात आल्या. याशिवाय सदरच्या कारवाई मध्ये 16 हिस्टरीशीटर्स चेक करण्यात आले, त्याचप्रमाणे हद्दीतील सर्व तडीपार आरोपी चेक करण्यात आले. पाहिजे असणारे आरोपी देखील चेक करण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेनुसार उपविभागामध्ये राबवण्यात आली. या कारवाईमध्ये शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तालक्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे (नशिराबाद), सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, सपोनि हरीश भोळे, गोटला पीएसआय पाथरवट व सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ तसेच शहर वाहतूक शाखेचा स्टाफ सामील झालेला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com