सामाजिक सलोख्यासाठी पोलिसांचे अभियान

जातीय, धार्मिक सलोख्याला पाठिंबा देण्यासाठी स्वाक्षरी संदेश मोहीम
सामाजिक सलोख्यासाठी पोलिसांचे अभियान

भुसावळ । bhusawal प्रतिनिधी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंगा वादानंतर वातावरण तापले आहे. दरम्यान काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांकडून सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कुठलाही जातीय तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी दोन्ही समाजात सांमजस्याचे वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे.

भुसावळ शहरात पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन, रजा टावर, अष्टभुजा चौक, नाहाटा चौफुली, रेल्वे स्टेशन पोलीस चौकी, यावल नाका व महात्मा गांधी पुतळ्याजवळ स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे (Sub-Divisional Police Officer Somnath Wakchaure) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी आ.संजय सावकारे (MLA Sanjay Saavkare) उपस्थित होते.

पोलिस प्रशासनाकडून जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील वादाचे प्रसंग टाळले जात असून, दोन्ही समाजात बंधुभाव निर्माण होतो. यामुळे वादाच्या घटनांमुळे पोलीस आणि लोकप्रतिनिधींचा ताण वाढतो. शहरात जातीय सलोखा आहेच, मात्र अशा कार्यक्रमांद्वारे सलोखा अधिक वाढणार असल्याचे आ.संजय सावकारे यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे (District Superintendent of Police Dr. Praveen Munde) यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नागरिकांमध्ये जातीय, धार्मिक सलोखा कायम राहावा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सर्व नागरिक पोलीस दलासोबत आहे, हा संदेश देण्याच्या उद्देशाने जातीय सलोखा जपण्यासाठी स्वाक्षरी संदेश ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे (Sub-Divisional Police Officer Somnath Wakchaure) यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.