गॅस एजन्सी चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

तीन लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
गॅस एजन्सी चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगव शहरातील, जे.जे. आण्णा टावरच्या बाजुला असलेल्या श्री बजाज (Bajaj) यांच्या मालकीच्या एच.पी. गॅस कंपनीच्या (H.P. Gas Company) कार्यालयातील चोरी प्रकरणी आरोपीला चाळीसगाव (police) पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, चोरीच्या पैशातुन खरेदी केलेले नवीन कपडे, गोवा राज्यातुन खरेदी केलेल्या विदेशी दारुच्या बाटल्या, इतर साहीत्य व सदर गुन्ह्यात जबरीने चोरुन नेलेली मोटारसायकल (Motorcycle) असा एकुण ३,लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गॅस एजन्सी चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी पण...

एच.पी.गँस कंपनीच्या कार्यालयातील चोरी प्रकरणी आरोपी भावेश मनोज माखीजा मुळ रा. उल्हासनगर ५, मुंबई. सध्या रा. सिंधी कॉलनी, चाळीसगांव याने रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास दुकानात घुसुन मँनेजर छाबडीया याचे हातावर चाकुने किरकोळ जखम करुन, त्यास शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देवुन, त्याच्याकडुन सुमारे ३ लाख ६५ हजार रुपये रोख रक्कम व छाबडीया याच्या मालकीची मोटारसायकल असा एकुण ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने हिस्कावुन चोरुन नेल्यामुळे चाळीसगांव शहर पो.स्टे. येथे भादवि कलम ३९४ अन्वये सदर आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

गॅस एजन्सी चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मुंबईकरांना गर्मी में ठंड का अहसास; AC लोकलचा प्रवास स्वस्त

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन (Superintendent of Police) पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे (Dr. Pravin Mundhe) यांच्या आदेशान्वये तसेच (Upper Superintendent of Police) अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (Ramesh Chopde) यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सहा.पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, पोना. भुषण पाटील, पोशि. विजय पाटील यांना लागलीच सदर आरोपीचा शोध घेणेकामी उल्हासनगर (मुंबई) या ठिकाणी रवाना करण्यात आले होते.

तपासा दरम्यान सदर आरोपी हा गोवा येथे गेल्याचे व दिनांक २८/०४/२०२२ रोजी गोवा येथुन विमानाने मुंबई येथे परत येणार असल्याबाबत माहीती मिळाल्याने सपोनि. कापडणीस व त्यांच्या पथकाने सहार विमानतळ, मुंबई येथे सापळा लावुन स्थानिक पोलीसांच्या मदतीनेसदर आरोपीस ताब्यात घेतलेले असुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

आरोपीताकडुन २ लाख २५ हजार रुपये रोख रक्कम तसेच आरोपीने जबरी चोरीच्या पैशातुन खरेदी केलेले नवीन कपडे तसेच गोवा राज्यातुन खरेदी केलेल्या विदेशी दारुच्या बाटल्या, इतर साहीत्य व सदर गुन्ह्यात जबरीने चोरुन नेलेली मोटारसायकल असा एकुण ३ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीला मा. न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी सुनावलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक विशाल टकले व पोना. राकेश पाटील हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com