वाहने जाळणार्‍या माथेफिरुमुळे पोलीस हैराण

गणपती नगरात जाळली तीन वाहने; आठवडाभरातील चौथी घटना
वाहने जाळणार्‍या माथेफिरुमुळे पोलीस हैराण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील गणपती नगरात (Ganapati Nagar) माथेफिरुकडून (Mathefiru) पेट्रोल टाकून (pouring petrol) दोन कार (Two cars) व एक दुचाकी (bike)जाळल्याची घटना (burning incident) शुक्रवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आठवडा भरातील वाहने जाळल्याची चौथी घटना असून त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहने जाळणार्‍या माथेफिरुमुळे पोलीस देखील हैराण (Police are puzzled) झाले आहे.

शहरातील गणपती नगरातील सातपुडा हौसिंग सोसायटीमध्ये लखन धनश्यामदास अडवाणी हे वास्तव्यास आहेत. त्यांनी (एमएच.19.सीझेड.2277) क्रमांकाची कार ही घराच्या कंपाऊंडमध्ये उभी केली होती. शुक्रवारी पहाटे 3.15 वाजेच्या सुमारास एक अज्ञात माथेफिरू तोंडाला रूमाल बांधून अडवाणी यांच्या कंपाउंडमध्ये शिरला. त्याने कापड आणि पेट्रोलच्या सहाय्याने कारला आग लावली. या आगीत कारची मागील बाजू जळून खाक झाल्यानंतर माथेफिरुने तेथून पळ काढला.

कारला आग लागताच कारमधील सायरन वाजू लागल्याने लखन अडवाणी यांना जाग आली. घरातून बाहेर आल्यावर त्यांना त्यांची कार जळताना दिसून आली. त्यांनी लागलीच कारवर पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. कार पेटत असताना त्यात लहान स्फोट देखील झाला. परंतु अडवाणी यांनी कारवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. मात्र, आगीत कारचे मागील पूर्ण भाग जळून खाक झाले आहे.

कुत्रे भुंकत असल्याने आली जाग

अडवानी यांची कार पेटविल्यानंतर माथेफिरुने त्यालगतच असलेल्या गणपती सातपुडा हौसिंग सोसायटीतीलच मिलन सलामतराय तलरेजा यांच्या घराकडे वळविला. माथेफिरू तरूणाने तलरेजा यांनी आठ महिंन्यांपुर्वीच घेतलेल्या कार (एमएच.19.डीव्ही.4194) सुध्दा कापड आणि पेट्रोलच्या सहाय्याने पेटवून दिली. घराबाहेर कुत्रे भुंकत असल्यामुळे बाजूच्या इमारतीमधील रहिवाशी घराबाहेर आल्यावर त्यांना कार पेटताना दिसून आली. त्यांनी तलरेजा यांना लागलीच फोन करून आगीची माहिती दिली. तलरेजा यांच्यासह नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. त्याचबरोबर माथेफिरूने (एमएच.19.डीझेड.7244) क्रमांकांची इलेक्ट्रीक बाईक सुध्दा जाळून नुकसान केले आहे.

कार पेटविणारा माथेफिरु सीसीटीव्हीत कैद

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी धाव घेतली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली असता, वाहने पेटविणारा माथेफिरु तरुण कार पेटवितांना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. त्यांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com