भुसावळात भोंगा वादावरुन पोलिस यंत्रणा अलर्ट

४० जणांना बजावली नोटीस : विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकार्‍यांचा समावेश
भुसावळात भोंगा वादावरुन पोलिस यंत्रणा अलर्ट

भुसावळ (Bhusawal) -

औरंगाबादच्या (Aurangabad) मनसे (MNS) मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thakre) यांनी भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर येथील पोलिस प्रशासन अलर्ट (Police Alart) झाले आहे. त्यांनी मनसेसह अन्य राजकीय पक्षांच्या ४० पदाधिकार्‍यांना कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे.

औरंगाबाद येथे सभेत राज ठाकरे यांनी ४ मे पर्यंत भोंगे खाली न उतरल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन (Hanuman Chalisa Pathan) करण्याचा इशारा दिला होता. मात्र, सण-उत्सव व शहरातील कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मनसेचे स्थानिक १२ पदाधिकार्‍यांना भादंवि १४९ अन्वये नोटीस बजावून घोषणाबाजी वा आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक (Vinod Pathak) यांच्यासह भाजप (BJP), बजरंग दल (BAGRANG DAL), हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान (HIndvhi swarajya pratastan) , विश्व हिंदु परिषद, एमआयएमच्या (|MIM) प्रमुख पदाधिकार्‍यांना ही नोटीस बजावली आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी ७ मे दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. आदेशाचे पालन करावे. मनसे पदाधिकार्‍यांच्या कृत्यामुळे शहर किंवा अन्यत्र कुठेही प्रश्न निर्माण झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यात नमूद केले आहे. दरम्यान, पोलिस संपूर्ण शहरात लक्ष ठेवून आहेत.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे (DYSP Somnath Waghchaure) यांनी ३ रोजी रात्री डीवायएसपी कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. शांतता कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केलेले आहे.

Related Stories

No stories found.