
जळगाव - jalgaon
जिल्हा प्रशासनातर्फे (District Administration) मराठी (Marathi) राजभाषा गौरवदिन, कविवर्य कुसुमाग्रज जन्म दिनानिमित्ताने निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन येत्या सोमवारी (ता.२७) करण्यात आले आहे.
काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयात (Kashibai Ukhaji Kolhe Vidyalaya) दुपारी तीन वाजता हे कविसंमेलन होईल. जळगाव आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे हे या संमेलनाचे उद्घाटन करतील. कविसंमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी रा.शे. साळुंके असतील. प्रमुख अतिथी म्हणून मराठी भाषा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) शुभांगी भारदे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित राहतील.
साहित्यिक डॉ.मिलिंद बागूल, डॉ.अ.फ.भालेराव, डॉ.प्रदीप सुरवाडकर, जितेंद्र कुंवर, राहुल निकम, विजय लुल्हे, प्रा. माधुरी अहिरे, इंदिरा जाधव, सुकदेव पाटील, शिवराम शिरसाठ, मुश्ताक करिमी, सचिन जंगले, गोविंद पाटील, भैयासाहेब देवरे हे कविसंमेलनात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ.नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, संयोजक उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांनी केले आहे.