कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी प्रा.एस.टी.इंगळे

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी प्रा.एस.टी.इंगळे

जळगाव jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) प्र-कुलगुरुपदी (Pro Vice Chancellor) राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी (Chancellor Bhagat Singh Koshyari) यांनी प्रा.एस.टी.इंगळे (Prof. S.T. Ingle) यांची नियुक्ती (Appointment) केली आहे. सध्या ते प्रभारी प्र-कुलगुरु म्हणून काम पहात होते.

राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र राजभवन कार्यालयाकडून मंगळवारी सकाळी विद्यापीठाला ई-मेलद्वारे प्राप्त झाले. मंगळवारीच प्रा.एस.टी.इंगळे यांनी नियमित प्र-कुलगुरु पदाचा पदभार स्वीकारला. ते विद्यापीठाचे दुसरे प्र-कुलगुरु असतील. त्यांच्या या नियुक्तीबाबत कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी प्रा.इंगळे यांचे अभिनंदन केले.

सद्य:स्थितीत प्रा.एस.टी.इंगळे हे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु पदाचा अतिरिक्तपदाचा कार्यभार गेल्या साडे तीन महिन्यांपासून पाहत होते. प्रा.इंगळे हे पर्यावरण व भूविज्ञान प्रशाळेत वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे
प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे

बुलडाणा जिल्हयाच्या मोताळा तालुक्यातील आडविहीर हे त्यांचे मुळ गाव असून प्राथमिक शिक्षण गावातच झाले आहे तर माध्यमिक शिक्षण शेंबा, तालुका नांदुरा येथे झाल्यानंतर पदवी व पदव्युतर शिक्षण औरंगाबादेत केले. मुंबई विद्यापीठातून पीएच.डी प्राप्त केल्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपती शाहु इन्स्टिटयुट येथे सात वर्षे अधिव्याख्याता म्हणून काम केले. डिसेंबर १९९९ मध्ये ते जळगावच्या विद्यापीठात प्रपाठक म्हणून रुजू झाले. त्याना ३१ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. प्रा.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केली असून ०६ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करीत आहेत. प्रा.इंगळे यांची ०३ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचे राष्ट्रीय ५० व आंतरराष्ट्रीय पातळीवर ४९ शोधनिबंध प्रसिध्द झालेले आहेत. आठ संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहे. त्यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य्‍ या पदासह विविध समित्यांवर तसेच अभ्यासमंडळावर काम केले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, प्रभारी वित्त व लेखाधिकारी एस.आर. गोहिल हे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com