कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘मराठी भाषा सवंर्धन पंधरवाडा’

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘मराठी भाषा सवंर्धन पंधरवाडा’
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

जळगांव jalgaon|प्रतिनिधी |

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (North Maharashtra University) भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या वतीने दि.१४ ते २८ जानेवारी, २०२२ ह्या कालावधीत साजरा केल्या जात असलेल्या ‘मराठी भाषा (Marathi Language) सवंर्धन पंधरवाडा’ (Fortnight’) महोत्सवाचे ऑनलाईन उदघाटन प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

उदघाटन सोहळ्याचा कार्यक्रम प्रसिध्द साहित्यिक प्रा.डॉ.म.सु.पगारे यांच्या कथकथनाने संपन्न झाला. प्रा.पगारे यांनी आपली ‘नाम्याचं भूत’ नावाची कथा आपल्या नाविन्यपूर्ण शैलीने सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कथेत प्रा.पगारे यांनी नाम्या नावाच्या पात्राच्या माध्यमातून समाजातील अंधश्रध्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून इंग्रजी विषयाच्या प्रा.डॉ.मुक्ता महाजन या महोत्सवाला उपस्थित होत्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांनी सांगीतले की, मराठी भाषा अधिकाधिक कशी समृध्द करता येईल याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा.

विद्यापीठाचा मराठी विभाग हा सातत्याने मराठी भाषा समृध्द करण्यासाठी नियमितपणे अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो, समाजातील इतर लोकांनी देखील मराठी भाषा समृध्द करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. आशुतोष पाटील यांनी केले.

सूत्रसंचालन व आभार नेत्रा उपाध्ये यांनी केले. कार्यक्रमाला प्रशाळेतील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमास खान्देशातील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व मराठी रसिक यांच्यासह प्रशाळेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवीला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com