कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे २३ ऑगस्ट पासून नॅक पुनर्मूल्यांकन

कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

जळगाव jalgaon (प्रतिनिधी)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhari North Maharashtra University) हे नॅक पुनर्मूल्यांकनाला (NAAC Evaluation) सामोरे जात असून मंगळवार दि. २३ ऑगस्ट पासून नॅक समिती (NAAC Committee) विद्यापीठाला भेट देणार (will visit) आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि प्रशाळा यांची जय्यत तयारी पूर्णत्वास आली आहे.

दि. २३ ते २५ ऑगस्ट असे तीन दिवस नॅक समिती विद्यापीठाला भेट देणार आहे. पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीला विद्यापीठ सामोरे जात आहे. सन २००१ मध्ये विद्यापीठाला नॅककडून चार स्टार, सन २००९ मध्ये बी ग्रेड (2.88 CGPA) प्राप्त झाली. सन २०१५ मध्ये तिसऱ्या साखळीत अे ग्रेड (3.11 CGPA) प्राप्त झाली. आता चौथी साखळी आहे. नॅकच्या या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठात गेल्या अनेक महिन्यांपासून कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व तयारी सुरु आहे.

दि. ११ व १२ ऑगस्ट रोजी माजी कुलगुरू प्रा. आर.एस. माळी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. विजय खोले आणि मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. आर.डी. कुलकर्णी यांच्या समितीने पूर्वतयारीचा आढावा घेवून काही सूचना केल्या.

तत्कालीन कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी अडीच वर्षांपूर्वी सुकाणू समिती स्थापन केली होती. समितीचे समन्वयक म्हणून प्रा. व्ही.एल. माहेश्वरी आणि सचिव प्रा. समिर नारखेडे व गुणवत्ता निर्धारण कक्षाचे संचालक म्हणून प्रा.एस.टी. इंगळे यांनी काम पाहिले आणि प्रशाळांचे संचालक आणि विभागप्रमुख तसेच प्रशासकीय विभागप्रमुख यांच्या वेळोवेळी बैठका घेवून विद्यापीठाचा स्वयंमूल्यांकन अहवाल तयार केला.

१३ प्रशाळा, १ इन्स्टिट्यूट, विद्यापीठाचे ३ उपकेंद्र आणि प्रशासन यांच्याकडून प्राप्त माहितीवर हा अहवाल तयार करण्यात आला. यामध्ये विद्यापीठाचे ध्येय धोरण, प्रशाळांमधील संशोधन, शैक्षणिक प्रगती, उपलब्ध पायाभूत सुविधा, मूल्यशिक्षण, विस्तारसेवा आदींचा या अहवालात समावेश आहे. जानेवारी २०२२ मध्ये विद्यापीठाने नॅककडे हा स्वयंमूल्यांकन अहवाल पाठविल्यानंतर जून मध्ये नॅक द्वारे हा अहवाल मान्य करण्यात आला. या अहवालाच्या आधारे नॅकद्वारे विद्यापीठाचे ७०% मूल्यमापन झालेले असून ३०% गुणवत्ता आधारीत मूल्यमापनासाठी नॅक समिती विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट देत आहे.

विद्यापीठाने गेल्या पाच वर्षात संशोधन, शैक्षणिक विकास यामध्ये आघाडी घेतलेली असून अनेक संस्था व विद्यापीठांची सामंजस्य करार केले आहेत. अभ्यासक्रमात नवे बदल, परीक्षा पध्दतीतील काही नवे प्रयोग, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून राबविल्या जाणाऱ्या योजना, विद्यापीठातील पायाभूत सुविधा यामुळे विद्यापीठाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या तीन दिवसात नॅक समिती सदस्य हे विद्यापीठ प्रशाळा, प्रशासकीय विभाग, वसतिगृह, क्रीडा संकुल, आदींना भेट देवून प्रत्यक्ष पाहणी करतील. कुलगुरूं समवेत समिती सदस्य चर्चा करतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com