कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतीय संविधान दिन

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतीय संविधान दिन

जळगाव jalgaon प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhari North Maharashtra University) विविध प्रशाळेत ( school) भारतीय संविधान दिन (Indian Constitution Day) साजरा करण्यात आला.   

प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांच्या उपस्थितीत प्रशाळेचे संचालक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासमवेत भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.  

सामाजिकशास्त्रे प्रशाळा व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजर करण्यात आला. यावेळी मंचावर न्यायमूर्ती श्रीमती एस.ए. कुलकर्णी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.अजय पाटील, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य मॅथ्यू अब्राहम, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सचिन नांद्रे, डॉ. उमेश गोगडीया, नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डागर, सरकारी वकील स्वाती निकम, अॅङ जिज्ञाली बडगुजर उपस्थित होते.  

सुरूवातीस भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन प्र-कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या उदघाटक न्या.श्रीमती एस.ए.कुलकर्णी यांनी भारतीय राज्यघटना व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा सरकारी वकील स्वाती निकम यांनी मूलभूत हक्क व मूलभूत अधिकार या विषयावर उद्बोधन केले. यावेळी नेहरू युवा केंद्राच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्रीमती रोशनी फिरोज शेख, तेजस पाटील, मुकेश भालेराव, शुभांगी फसे, रोहन अवचारे, मनोज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संविधानपर उत्कृष्ट भाषण भाग्यश्री शेळके या विद्यार्थिनीला पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय घोरपडे यांनी केले. याकार्यक्रमास डॉ. दिपक सोनवणे, अजिंक्य गवळी, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.    

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतीय संविधान दिन
अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत आशिया खंडात जळगावची भाग्यश्री पाटील प्रथम

विद्यापीठाच्या रासायनिक ‍तंत्रज्ञान संस्थेत देखील भारतीय संविधान दिना निमित्त भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया, भारतीय राज्य घटनेतील रूपरेषा तसेच व्याप्ती या विषयावर विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. म.सु. पगारे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संचालक प्रा.जे.बी. नाईक हे होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा सुरवाडे यांनी तर आभार प्रा. विनीत काकडे यांनी मानले. यावेळी रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.  

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com