दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण

140 महिलांची टीम करणार उद्दीष्ट पूर्ण
दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण

अमळनेर - प्रतिनिधी amalner

तालुक्यातील दहिवद येथे बिहार पॅटर्न (Bihar Pattern) अंतर्गत गुरुवार दि.४ रोजी सात हजार झाडे लावण्याच्या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. महिला, ग्रामस्थ तसेच पदाधिकारी 7 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहेत. त्यामुळे हा परिसर हिरवाईने नटनार आहे.

सरपंच देवानंद बहारे यांनी महात्मा गांधी रोजगार योजनेतून बिहार पॅटर्न राबवण्यासाठी 140 महिलांची टीम बनवून गावात 7 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट हाती घेतले.

दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

अध्यक्षस्थानी छत्तीसगडचे उद्योगपती व दहिवद चे भूमिपुत्र दिनेश पाटील (सदस्य भारतीय कृषि अनुसंधान परिषद, कृषि कल्याण मंत्रालय नवी दिल्ली) होते तर कार्यक्रमाचे उद्घाघाटक प्रवीण काशिनाथ माळी (माजी उपसरपंच दहिवद) प्रमुख मान्यवर म्हणून मिनाबाई रमेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जळगाव, जयवंत गुलाबराव पाटील चेअरमन नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद, ईस्वर गिरधर माळी चेअरमन दहिवद विविध कार्यकारी सोसायटी, अनिल भटा माळी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद मराठी शाळा, राजेंद्र देसले सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी काशिनाथ माळी माळी समाज पंच मंडळ उपाध्यक्ष दहिवद, ग्रामपंचायत सदस्य माणिकराव पाटील, हिराबाई धुडकर, आशाबाई माळी, वर्षा पाटील, योगिता गोसावी, मालुबाई माळी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सोनवणे, तांत्रिक अधिकारी धिरज पाटील, ग्रामरोजगार सेवक भागवत सोनवणे, दहिवद विकास मंचचे गोकुळ माळी, गुलाब पाटील,गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, गावातील आजी माजी पदाधिकारी, नवभारत माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी आश्रमशाळा मुख्याध्यापक कर्मचारी, जिल्हा परिषद मराठी शाळा मुख्याध्यापक, कर्मचारी, उपकेंद्र दहिवद कर्मचारी, विद्यतू वितरण कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कर्मचारी, पीक संरक्षक सोसायटी पदाधिकारी उपस्थित होते.

दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com