भुसावळ बस स्थानकातील खड्डयांमध्ये पीआरपीचे वृक्षारोपण

भुसावळ बस स्थानकातील खड्डयांमध्ये पीआरपीचे वृक्षारोपण

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

अत्यंत महत्वाचे दळण वळण व्यवस्था असलेल्या येथील बस स्थानकाची (Bhusawal Bus Station) अत्यंत दुर्दशा (extreme predicament) झाली असून चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे स्थानकाच्या अर्ध्याअधिक भागामध्ये पाणी साठले (Water accumulated) आहे. प्रशासनाचे लक्ष वेधावे व दुरस्ती व्हावी म्हणुन पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या (People's Republican Party) कवाडे गटाचे जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात या पाण्यात वृक्षारोपण (Plantation in water)करून अभिनव आंदोलन केले.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बस स्थानकात सर्वत्र खड्डे झाले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. येथे बसेस उभ्या करणे वाहन चालक, प्रवाशी यांना पायी चालणे कठीण होवून गेले आहे.

प्रशासन सुस्त असून लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष कारणीभूत आहे. बसस्थानक व परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण व्हावे, अशी मागणी करून प्रशासनाचा निषेध म्हणून या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

या आंदोलनात जगन सोनवणे, राकेश बग्गन व इतरांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com