पिंप्राळा रेल्वे गेट आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद

रेल्वे प्रशासनाचा निर्णय; बजरंग बोगद्याव्दारे पर्यायी वाहतुकीची व्यवथा
पिंप्राळा रेल्वे गेट आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

येथील पिंप्राळा रेल्वे गेट (Pimprala Railway Gate) आजपासून म्हणजेच दि. 12 पासून कायमस्वरूपी वाहतुकीसाठी बंद (Closed to traffic) करण्यात येणार आहे. रेल्वेगेट पलीकडे जाणार्‍या अनेक परिसरात जाण्यासाठी हे गेट सुरू करण्यात आले होते. शिवाजीनगर उड्डाणपूल (Shivajinagar flyover for traffic) वाहतुकीस खुला केल्याने रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) हे गेट बंद (Gate closed) करण्याचा निर्णय (decision) घेतला आहे. आता पर्यायी वाहतूक बजरंग बोगद्यातून होणार आहे. तर मोठ्या वाहनांना शिवाजीनगर पुलावरून जाण्याचा मार्ग मोकळा आहे. जोपर्यंत पिंप्राळा रेल्वेगेटवर उड्डाणपूल पूर्ण होत नाही तोपर्यंत नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.

मुंबई-भुसावळ रेल्वे सुरू झाल्यानंतर अनेक वर्षांनंतर भोईटेनगर, पिंप्राळा भागातून शहरात येणार्‍या वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर 1960 मध्ये रेल्वे गेट सुरू करण्यात आले. तेव्हापासून हे गेट सुरूच होते.

रेल्वे प्रशासनाने देशभरातील रेल्वेगेट बंद करून त्याठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जळगावमधील असोदा रेल्वेगेट, पिंप्राळा रेल्वेगेट, सूरत रेल्वेगेटचा त्यात सामावेश होता. सध्या असोदा व पिंप्राळा रेल्वेगेटजवळ रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पिंप्राळा परिसरात, शिवाजीनगर परिसरात जाण्यासाठी आता शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम झाले आहे. यामुळे तो पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. यामुळे सोमवारपासून पिंप्राळा रेल्वेगेट वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद केले जाणार आहे. मुंबई, पुणेकडे जाणार्‍या व येणार्‍या रेलवेगाड्यांची संख्या अधिक होती.

शिवाय रेल्वे मालवाहतुकीच्या गाड्या जेव्हा ये-जा करीत तेव्हा तेव्हा पिंप्राळा रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद केले जात असे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. आगामी काही महिन्यात पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे पूर्ण झाल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. तोपर्यंत भोईटनगर, प्रेमनगर, पिंप्राळा आदी परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

वाहतूक वळविली

मालधक्क्याची वाहतूक महामार्गावरून, तर भोईटेनगर परिसरातील मालधक्क्यावरील वाहनांची वाहतूक रिंगरेाडमार्गे होत होती. यामुळे वाहतुकीची कोंडी पिंप्राळा रेल्वेगेटवर अधिक होत होती. आता ही मालवाहतूक बंद होऊन गुजराल पेट्रोलपंपमार्गे जुन्या महामार्गाने मालधक्क्यावर येईल.

नागरिकांना प्रश्न

शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामाला जसा विलंब झाला तसाच विलंब पिंप्राळा उड्डाण पुलालाही होणार का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांमधून उपस्थित होत आहे. कारण या परिसरात देखिल मोठी लोकसंख्या रहिवास करीत असल्याने त्यांना हा मार्ग सोयीस्कर होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com