#Photos # युवारंग युवक महोत्सवाचा गुरुवार दर्जेदार कलाविष्कारांनी गाजला

 #Photos # युवारंग युवक महोत्सवाचा गुरुवार दर्जेदार कलाविष्कारांनी गाजला

जळगाव jalgaon (प्रतिनिधी)

युवारंग (Yuvarang) युवक महोत्सवाचा ( Youth Festival) गुरुवारचा दिवस विडंबननाट्य,(Parody) मुकनाट्य, समुहगीत (भारतीय व पाश्चिमात्य), वादविवाद, सुगम गायन भारतीय, कोलाज, क्ले मॉडेलिंग आणि स्पॉट पेटींग या कला प्रकारातील दर्जेदार कलाविष्कारांनी (quality artwork) गाजला.

मोबाईलचे दुष्परिणाम (side effects of mobile), शहिद जवानांच्या घटनांवर राजकारण, अखंड भारत अशा एक-ना-अनेक विषयांवर सादर झालेल्या दर्जेदार कलाविष्कारांनी युवारंग गाजतोय . विविध कलाप्रकारांमुळे विद्यार्थ्यांना (students) मिळालेले हक्काचे व्यासपीठ अनेकांनी गाजवत आपल्यातील कलेचा परिचय दिला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) आणि पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (College of Pharmacology and Senior College of Arts, Science and Commerce) शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पाच रंगमंचावर सकाळपासून विविध कलाप्रकारांच्या स्पर्धा (Art competitions) सुरू झाल्या. सर्वच रंगमंचावरून प्रेक्षकांचे मनोरंजन आणि विविध संदेश देण्यात आले.

खुला रंगमंच क्र.१ वर (स्वा.से.अण्णासाहेब पी.के.पाटील रंगमंच) विविध समाजिक समस्या हाताळत वैशिष्टपूर्ण वेशभुषा आणि कसदार अभिनयातून २१ स्पर्धकांनी मुकनाट्य सादर केले. महिलांवर होणारे अत्याचार, शहिद जवानांच्या घटनांवर राजकारण, अखंड भारत असे अनेक सामाजिक आणि राजकीय विषय ताकदीने मांडत युवक महोत्सवाचा दुसरा दिवस रंगकर्मीनी गाजवला. प्रेक्षकांचीही भरभरून दाद या मुकनाट्याला मिळाली.

बंदिस्त रंगमंच क्र.२ वर (बालहुतात्मा शिरीष कुमार रंगमंच) पाश्चिमात्य सुगमगायन या कला प्रकारात १६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला तर पाश्चिमात्य समुहगीत स्पर्धेत ८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. भारतीय समुहगायन स्पर्धेत २० स्पर्धक सहभागी झाले. हिंदी-मराठी गाण्यांइतकच पाश्चिमात्य गाणीही स्पर्धक कालावंतानी अत्यंत बहारदारपणे सादर केले. क्वायर अर्थात कोरस या प्रकारातील सुरेल पाश्चिमात्य गीतांना प्रेक्षकांनी उचलून धरले होते. भारतीय समुहगीत स्पर्धेत गोंधळ, देशभक्ती, लोकगीत, पाळणा, पारंपारिक गीत, लग्नगीत, युवक गीत, मल्हार गीत यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. त्या- त्या प्रांतातील लोकगीते सादर करतांना अनेकांनी त्या प्रातांशी जोडली गेलेली वेशभूषा केल्याने स्पर्धेची रंगत वाढली. लोकगीतांमधील सुरांसह त्यातील भावनीकता जपत स्पर्धक कलावंतानी या गीतांचे सादरीकरण केले.

बंदिस्त रंगमंच क्र.३ वर (हुतात्मा लालदास शहा रंगमंच) ४१ स्पर्धकांनी ‘ऑन लाईन शिक्षण योग्य की अयोग्य’ यावर मांडलेल्या मतातून व्यक्त केल्या आपल्या संवेदना. एकमेकांचे मुद्दे खोडत असताना शिक्षणाबाबत संवेदनशील असल्याची प्रचितीही यावेळी तरुणांनी दिली.

बंदिस्त रंगमंच क्र.४ वर (वीर भगतसिंग रंगमंच) भारतीय सुगमगायन स्पर्धेत ३४ स्पर्धकांनी गझल,भक्तीगीते, अभंग, काव्य सादर करून उपस्थितांची मने जिकंली. आपल्या सुमधूर गायनास स्पर्धकांसोबत असलेल्या विद्यार्थ्यांकडून टाळ्याच्या कडकडात दाद देण्यात आली.

बंदिस्त रंगमंच क्र.५ वर (वीर बिरसामुंडा रंगमंच) सकाळी कोलाज ही स्पर्धा झाली. स्पर्धकांना निसर्गचित्र, व्यक्तीचित्र आणि वस्तुचित्र हे विषय देण्यात आले. मासिके, वर्तमानपत्राच्या कागदांच्या सहाय्याने कलावंतांनी उत्कृष्ट कोलाज तयार केले. यात २७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. याच मंचावर दुपारी क्ले मॉडेलिंग स्पर्धा झाली. सहभागी २५ स्पर्धक कलाकारांनी वात्सल्य, ग्रामीण जिवन, आवडता प्राणी आणि एच्छिक या विषयावर शाडू मातीच्या माध्यमातून प्रतिकृती तयार करून सर्वांचे लक्ष वेधले. दुपारच्या दुसऱ्या सत्रात स्पॉट पेटिंग ही स्पर्धा घेण्यात आली. युवा महोत्सवाच्या परिसरात ठिकठिकाणी युवा चित्रकारांनी चित्र रेखाटली.

पुज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटने क्रांतीविर खाज्या कक्ष उभारून त्यात आर्ट गॅलरी सजवली आहे. या आर्ट गॅलरीत पोस्टर्स, रांगोळी, हस्तचित्रांच्या माध्यमातून पर्यावरणाचे सरक्षण, वृक्षतोड, कापडी पिशव्यांचा वापर, अंधश्रध्दा निमूर्लन, लेक वाचवा या विषयावर जनजागृती करीत आहेत. रासेयोचे स्वंयसेवक प्रेक्षकांना माहिती देत आहेत.

शुक्रवार दि.२२ रोजी होणाऱ्या स्पर्धा

खुला रंगमंच क्र.१ वर (स्वा.से.अण्णासाहेब पी.के.पाटील रंगमंच) समुह लोकनृत्य, बंदिस्त रंगमंच क्र.२ वर (बालहुतात्मा शिरीष कुमार रंगमंच) शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत बंदिस्त रंगमंच क्र.३ वर (हुतात्मा लालदास शहा रंगमंच) वक्तृत्व, बंदिस्त रंगमंच क्र.४ वर (वीर भगतसिंग रंगमंच) फोटोग्राफी (भारतीय) व बंदिस्त रंगमंच क्र.५ वर (वीर बिरसामुंडा रंगमंच) चित्रकला, इनस्टॉलेशन, मेहंदी हे कला प्रकार सादर केले जातील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com