Photos# राज्य नाट्य स्पर्धा 2022 : मडवॉक : बुध्द तत्वज्ञानावरील सर्वांगसुंदर नाट्यानुभव!

Photos# राज्य नाट्य स्पर्धा 2022 : मडवॉक : बुध्द तत्वज्ञानावरील सर्वांगसुंदर नाट्यानुभव!

जळगावातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात रात्री दर्दी रसिकांच्या वाढत्या गर्दीत सादर झालेले मुळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे मडवॉक हे राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी सादर झालेले तिसरे नाटक.

स्पर्धेसाठी नवी, सशक्त नाट्यसंहिता देत सफाईदार आणि तंत्रशुध्द सादरीकरणाची यशस्वी परंपरा याही वर्षी कायम राखत मडवॉक सादर झाले. आणि संदेशग्राही सशक्त नाट्य संहिता जोडीला कसदार अभिनय कल्पक दिग्दर्शन तंत्रज्ञानाची चोख आणि सफाईदार कामगिरी या बलस्थानांमुळे प्रयोगातील प्रथितयश नाटककार श्रीपाद देशपांडे लिखीत मेहनती रंगकर्मी दिनेश माळी दिग्दर्शित भगवान गौतम बुध्दांच्या कल्याणकारी वैश्विक तत्वज्ञानावर आधारीत असलेले हे नाटक एक सर्वांगसुंदर नाट्यानुभव देवून गेले त्याबद्दल समस्त रंगकर्मींचे मनस्वी अभिनंदन!

माणसाने माणसासाठी माणसासम वागणे हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे या अर्थपूर्ण उक्तीप्रमाणे कुठलही कर्माची शिकवण माणुसकी आणि मुलाधार मानवता हाच असतो. कोणताही धर्म हिंसा, जातीयता, वंशवाद या समाज विघातक गोष्टींना थारा देत नाही याउलट धर्मनिरपेक्षता, समानता, प्रेम, सद्भावना, सहिष्णुता याच शिकवणीवर प्रत्येक धर्माची पताका फडकत रहावी अशी माफक अपेक्षा सर्वांचीच असते.

परंतू दुर्देवाने धर्मांध अनुयायांमुळे मूळ शिकवण वा कल्याणकारी विचार बाजूला राहून माणसा-माणसात अकारण विव्देष निर्माण होतो. भगवान गौतम बुध्दांचे तत्वज्ञान मानवतेचा रचनात्मक आणि सकारत्मक संदेश देणारेच आहे. माणसाच्या दुःखाची कारणे शोधण्यासाठी स्वतःला सिध्द करण्याची गौतम बुध्दांनी आधी माणूस वाचला सत्याचा शोध घेतला. आज संपूर्ण जगाने बुध्द विचार आणि मार्ग शांतीचा, सद्भावनेचा, सहीष्णुतेचा असल्याने मान्य करुन बुध्द समजून घ्यायला आणि वाचायला सुरुवात केलीय.

प्रस्तुत नाट्यप्रयोगात प्रत्यक्षात बुध्दांचे तत्वज्ञान जगलेला मंडवाकर बेंजामिन फ्रँकलीन (वैभव मावळे), पी.एचडी शिष्यवृत्तीधारक संशोधक विद्यार्थी असलेला रघू (सिध्दांत सोनवणे), बब्बू (लोकेश मोरे), दुर्गा (तेजसा सावळे) यांना सिध्दार्थाचा गौतमबुध्द होण्यापर्यंतचा खडतर प्रवास आणि त्यानंतर आत्मशुध्दीचा आणि मानव कल्याणाचा लागलेला शोध नीटपणे समजावून सांगतो. शुन्यातून सौंदर्य शोधता आले पाहीजे. धम्म म्हणजे धर्म नव्हे तर ते एक शाश्वत व मौलिक विचार आहे. खरेतर बुध्द जगणे आणि पचविणे तसे अवघड आहे. असे पथदर्शी मार्गदर्शन करतो.

कागदोपत्री पी.एचडी गाईड असलेल्या डॉ.रघुवीर देशपांडेंचे मार्गदर्शन नाकारुन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी बेंजामिनने समजावून सांगितलेल्या बुध्द मार्गाची मांडणी आपल्या संशोधन ग्रंथात करतात आणि पी.एचडी ही पदवी प्राप्त करतात आणि भगवान गौतम बुध्दांच्या तत्वज्ञानावरील हे संदेशग्राही नाटक सर्वांगसुंदर सादरीकणामुळे जाणत्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरते.

दिग्दर्शक या नात्याने दिनेश माळी यांनी संहितेची जातकुळ ओळेखून दिलेली ट्रीटमेंट सादरीकरण गतीमान आणि प्रभावी करण्यात यशस्वी ठरली. अभिनयाच्या बाबतीत सवर्जनशिल रंगकर्मी वैभव मावळेेंचा मध्यवर्ती भूमिकेतील बेंजामीन फ्रँकलिन केवळ अविस्मरणीय त्यांना कायिम व वाचिक अभिनयाची उत्तम जाण आहे. त्यांना सहभूमिकांमध्ये सिध्दांत सोनवणे (रघू), लोकेश मोरे (बब्बू), तेजसा मावळे (दुर्गा), संदीप तायडे (डॉ.रघुवीर) यांनी समर्थ साथ केली. सर्वश्री प्रथम तायडे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रज्ञा बिर्‍हाडे, अजय पाटील, सनी चव्हाण, दुष्यंत तिवारी, अनिकेत यशोध, सुमित सोनवणे, यश मराठे, ज्योती पाटील, प्रांजल पाटील, गायत्री सोनवणे यांनी आपआपल्या भूमिका आत्मविश्वासपूर्वक केल्या.

तांत्रिक बाबतीत पियुष बडगुजर, ज्ञानेश्वर चव्हाण, अभिषेक कासार, अजय पाटील यांची प्रकाश योजना परिणामकारक शुभांगी वाडीले, दिपक महाजन यांचे पार्श्वसंगित प्रसंगांना गती देणारे आणि उठावदार, प्रज्ञा बिर्‍हाडे (रंभभूषा), प्रथम तायडे (वेशभूषा), अजय पाटील (रंगमंच सहाय्यक) यांनीही तोलामोलाची साथ केली. प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, शशिकांत वडोदकर, प्रा.मिलन भामरे, प्रा.राज गुंगे, भगवान जगनोर यांच्या कुशल मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे यांची मडवाकर ही संदेशग्राही निर्मिती सर्वांगसुंदर ठरली. (पहिला अंक काहीसा परिचयात्मक) हे अगदी निर्विवाद!

आजचे नाटक सुखांशी भांडतो आम्ही, माध्यप्रदेश मराठी अकादमी, इादौर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com