
रवींद्र पाटील Gudhay
गुढे. ता. भडगाव
येथील सुप्रसिद्ध लिंबू उत्पादक आदर्श शेतकरी कै.अंकुश रामा माळी याचे चिरंजीव प्राथमिक शिक्षक सुभाष माळी व त्यांचे दोन्ही इंजिनिअर मुले वैभव व दिनेश माळी यांनी पारंपरिक शेती व्यवसायात (agricultural business) होत असलेला बदल पाहता आपल्या शेतात २० गुंठयात अनोखा प्रयोग केला. ड्रॅगन फ्रुटचा मळा (dragon fruit garden) फुलवून साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.
भालकर (माळी) परिवार गावात व परिसरात बागाईत, फळबागाईत, भाजीपाला बरोबर लिंबू, पेरू,आंबा,पपई व रोपे, कलम आदी शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. या परिवारातील कै. अंकुश रामा माळी यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले सुभाष अंकुश माळी हे जरी शिक्षक असले तरी ते हाडाचे शेतकरी देखील आहेत. ज्ञानदानाचे कामा बरोबर उर्वरित वेळात त्यांचे व कुंटुबाचे हात शेतात राबतात.
सुभाष माळी यांच्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. या दोन्ही मुलांना सोबत घेऊन त्यांनी पारंपरिक शेती बरोबर आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुट लावण्याचा विचार केला. यासाठी वैभव व दिनेश माळी यांनी उस्मानाबाद येथे जाऊन ड्रॅगन फ्रुट फळांबाबत माहिती घेतली,. जानेवारी २०२० ला आपल्या शेतात २० गुंठ्यात ६ बाय १० अंतरावर सिंमेटचे पोल व सिंमेट रिंग टाकून व्यवस्था केली आणि ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. या नवीन अनोख्या गावाकडील शेतात व खळवाळला कुंपण असणारी काटेरी सांबर कांड्या सारख्या दिसणारे झाड असते याला ती फळे येतात.
या फळबागेसाठी लागणारे उष्ण वातावरण आपल्याकडे नैसर्गिक असल्याने त्यांनी या परिसरात व गावात मोठे धाडस केले.ठिंबक सिंचन व शेणखत देऊन यातील अंतर्गत मशागत व देखभाल पाण्याचे योग्य नियोजन करून लागवड नंतर १८ महिन्यात या बागेत जुलै ते जानेवारी असा फळबहार येण्याचा कालावधी असून हे फळ सुरुवातीला अल्प संख्येत सुरुवात झाली. तरी त्यांनी ही नवीन फळे आपल्या स्थानिक बाजारपेठ हात विक्री करून २० गुंठयात अवघ्या १८ महिन्यात साडेतीन लाखाचे उत्पन्न घेतले आहे.
इच्छा असेल तर मार्ग दिसेल असा मूलमंत्र या शिक्षक व इंजिनिअर पिता पुत्रांनी यशस्वी ठरवला आहे. साधारण लागवडीसाठी सुरवातीला एकरी तीन लाख रुपये खर्च अपेक्षित असतो या नवीन फळ भागाची काळजी, नियोजन केले तर सदर बाग २० वर्ष आपल्या फळे देतात.