जीवन आणि मृत्यूला उत्सव मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्व.विठ्ठलदास गुजराथी : प्रा.अरुणभाई गुजराथी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय विठ्ठलदास गुजराथी यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
जीवन आणि मृत्यूला उत्सव मानणारे व्यक्तिमत्व
म्हणजे स्व.विठ्ठलदास गुजराथी : प्रा.अरुणभाई गुजराथी

चोपडा Copada ( प्रतिनिधी )
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) जेष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय विठ्ठलदास गुजराथी (Late Vitthaldas Gujarathi) दिशा देणारे व्यक्तिमत्व होते जीवन कसे जगावे हे विठ्ठल काकांकडून शिकावं ! शहरातील गणपती उत्सव,श्री बालाजी रथोत्सव कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. ते नगराध्यक्ष किंवा आमदार झाले नाहीत परंतू शहराचे पालक मात्र झाले,संकट काळात धावून येणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. माझे जीवन एक उत्सव आहे तर मृत्यू देखील उत्सव आहे असे मानणारा मोठा माणूस,दुःखात आनंद निर्माण करणारे व्यक्तिमत्व तसेच सर्वांना सोबत घेऊन चालणारा माणूस म्हणजे स्वर्गीय विठ्ठलदास गुजराथी होय अशा शब्दात विधानसभेचे माजी
अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी (Prof. Arunbhai Gujarathi) यांनी श्रद्धांजली (Tribute) वाहिली.

येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते, पीपल्स को-ऑप बँकेचे माजी चेअरमन, कसबे सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व चोपडे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, श्री व्यंकटेश बालाजी मंदिर संस्थानचे मुख्य ट्रस्टी तथा दसा दिसावल गुजराथी समाजाचे अध्यक्ष विठ्ठलदास छगनलाल गुजराथी उर्फ व्ही.सी.अंकल यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दि.२९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता वृध्दापकाळामुळे निधन झाले.त्या निमित्त आज दि.३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता शहरातील डॉ.हेगडेवार चौकात सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्याक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी चोसाकाचे माजी चेअरमन
अड.घनशाम पाटील,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अड.संदीप पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या,भाजपचे जेष्ठनेते शांताराम आबा पाटील,पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी नगरपरिषदे तर्फे गटनेते जीवन चौधरी,नगरसेवक डॉ.रवींद्र पाटील,इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे डॉ.अशोक पाटील,प्रताप शाळेचे माजी मुख्याध्यापक टी.एम.चौधरी,उर्दू विभागाचे शिक्षक एजाज सर,माजी शिक्षक ए.के.बोहरी सर,कसबे सोसायटीचे संचालक श्रीकांत नेवे, विठ्ठल रतन बोरसे (गोरगावले खु!),जेष्ठ नागरिक संघा तर्फे करोडपती सर,भगिनी मंडळ संस्थेचे एस.डी.चौधरी सर,अमर संस्था वडती हायस्कुलचे जोशी सर,घोडगाव येथील सी.बी.निकुंभ हायस्कुलच्या संध्या शहा, नगरसेवक डॉ.रवींद्र पाटील,नगरवाचन मंदिर संस्थेतर्फे गोविंद गुजराथी,चोपडे एज्युकेशन सोसायटीचे सचिव माधुरी मयूर,गुजराथी समाजा तर्फे प्रा.शामभाई गुजराथी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघ चालक राजेश पाटील,देवगिरी प्रांत प्रमुख स्वानंद झाले यांनी स्वर्गीय विठ्ठल काकांना श्रद्धांजली
वाहिली.सभेला बाजार समितीचे सभापती दिनकरराव देशमुख,जिल्हा परिषद सदस्या प्रा.डॉ निलम पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम म्हाळके,पीपल्स बँकेचे व्हॉ.चेअरमन प्रवीण गुजराथी,संचालक नेमीचंद जैन,व्यापारी महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव,नगरसेवक हितेंद्र देशमुख यांचेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com