जळगावकरांनो, इमारतीच्या बेसमेंटचा व्यावसायीक वापर करत असाल तर ...

कारवाईसाठी मनपा प्रशासनाकडून सर्वेक्षण; लवकरच कारवाई
जळगावकरांनो, इमारतीच्या बेसमेंटचा व्यावसायीक वापर करत असाल तर ...

जळगाव- jalgaon

शहरातील बहुमजली इमारतीत (multi-storey building) बेसमेंटमध्ये (basement) पार्किंगच्या जागेवर (parking lot) व्यावसायिक वापर (Commercial use) होत असल्याने महापौरांनी कारवाईचे आदेश (Mayor orders action) दिले होते. त्यानुसार मनपाच्या नगररचना विभागातर्ङ्गे गुरुवारी टॉवर चौक ते भीलपूरा चौकापर्यंत ११ इमारतींचे सर्वेक्षण (Survey of buildings) केले. या इमारतीमध्ये व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून, संबंधीतांवर कारवाई प्रस्तावित (Action proposed)केली जाणार आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक इमारतीतील बेसमेंटमध्ये पार्किंगच्या जागेवर व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. वारंवार तक्रारी होत असतांनाही मनपा प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे चार दिवसांपुर्वी महापौर, उपमहापौरांनी नगररचना विभागाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत तातडीने कारवाई करण्याची सूचना महापौरांनी दिली होती. त्यानुसार नगररचना विभागातर्ङ्गे गुरुवारपासून कारवाईची मोहीम सुरु केली आहे.


इमारतींचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केल्यानंतर मंजूर नकाशे तपासण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधीतांना नोटीस देवून कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. मनपाच्या नगररचना विभागातर्ङ्गे बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणार्‍यांवर कारवाईची मोहीम गुरुवारपासून सुरु केली आहे. आज पहिल्या दिवशी नगररचना विभागाचे अभियंता समीर बोरोले, अतुल पाटील, जयंत शिरसाठ यांच्यासह कर्मचार्‍यांनी टॉवर चौक ते भीलपूरा चौकापर्यंत सर्वेक्षण केेले आहे. या सर्वेक्षणात ११ इमारतीतील बेसमेंटमध्ये व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com