पाटणा अभयारण्यात गारगोटी तस्कर वनविभागाच्या जाळ्यात

आरोपीकडून १२ किलो गारगोटीसह साहित्य जप्त
पाटणा अभयारण्यात गारगोटी तस्कर वनविभागाच्या जाळ्यात

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील पाटणा अभयारण्यात (Patna Sanctuary) अवैध्य रित्या गारगोटी (Pebble) व मौल्यवान खडकाचे (precious stones) उत्खनन (Excavation) करताना वनविभागाच्या पथकाने (forest department) एकाला सापळा रचून अटक (Arrested) केली आहे. तर त्याचे इतर साथीदार पसार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीकडून १२ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या गारगोटी व इतर मौल्यवान खडक जप्त करण्यात आले आहे. हि कारवाई दि,९ रोजी करण्यात आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) चाळीसगाव यांना सदर अभयारण्यामध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. सदर ठिकाणी कारवाईसाठी गेले असता, त्या ठिकाणी तीन इसम अभयारण्यामध्ये अवैध उत्खनन करत असल्याचे आढळून आले. त्यापैकी एक वन गुन्हेगार तोहिद युसुफ खान (वय २० वर्ष) रा. गराडा ब्राह्मणी, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद याला वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी उत्खनन करतेवेळी धाडसाने पकडले.

तर त्याचे दोन साथीदार त्या ठिकाणाहून घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पळून गेले. पकडलेल्या आरोपीकडून १२ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या गारगोटी सदृश मौल्यवान खडक व वनगुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली अवजारे वन विभागाच्या पथकाने जप्त केली. पकडण्यात आलेल्या आरोपीला प्रथम न्यायदंडाधिकारी चाळीसगाव यांचे समक्ष हजर केले असता त्यास चार दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

घटनेचा तपास उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई हे करीत आहेत.

यांचा होता कारवाईत सहभाग-

सदर कारवाई सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती आशा चव्हाण , जळगाव जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनपरिक्षेत्राधिकारी ज्ञानेश्वर देसाई, वनपाल पाटणा ललित गवळी, वनपाल बोढरा दीपक जाधव, कन्नड वनपरिक्षेत्रातील पारधी वनपाल वनरक्षक उमेश सोनवणे, अजय महिरे यांच्यासोबतच कन्नड वनपरिक्षेत्रातील वनरक्षक तसेच वाहन चालक उमेश शिंदे व बापू आगोणे, रोजंदारीवर मजूर राजाराम चव्हाण, नितीन राठोड, गोरख राठोड, नाना पवार, मेघराज चव्हाण, अनिल शितोळे, गणेश राठोड, शुभम राठोड आदिच्या पथकाने केली आहे. नागरिकांना वन्यजीव विभागातर्फे वन व वन्यजीव विषयाशी निगडीत कोणतीही अवैध बाब निदर्शनास आल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com