गाळेधारकांकडून ५० लाख रुपयांचा भरणा

उपायुक्तांकडे धनादेश सुपूर्द
गाळेधारकांकडून ५० लाख रुपयांचा भरणा

जळगाव- jalgaon

मनपा मालकीच्या (Corporation owned) मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील (commercial complex) गाळेधारकांकडे (occupants) गेल्या काही वर्षांपासून थकबाकी(Arrears) आहे. थकबाकीपोटी प्रशासनाने कारवाईची (administration) मोहीम सुरु केली होती. दरम्यान, कारवाई (Action taken) टाळण्यासाठी आणि प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मनपा गाळेधारक संघटनेने (Municipal Stakeholders Association) पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ३५ ते ४० गाळेधारकांनी थकबाकीपोटी २५ टक्के रकमेचा भरणा केला आहे. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ५० लाखांचा धनादेश उपायुक्त प्रशांत पाटील (Deputy Commissioner Prashant Patil) यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला.


शहरातील मनपा मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपुष्टात आली आहे. तेव्हापासून ते आजतागायत गाळेधारकांकडे भाडेपोटी थकबाकी आहे. दीड वर्ष कोरोना काळात व्यवसाय बंद असल्याने गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, प्रशासानाने किमान ५० टक्के थकबाकी भरण्याची सूचना केली होती. जे गाळेधारक थकबाकी भरणार नाही त्यांच्यावर सीलची कारवाई करण्यासाठी मोहीमदेखील राबविली होती. त्यामुळे व्यापारी आणि प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला होता.


नगरविकास मंत्र्यांनी केली होती थकबाकी भरण्याची सूचना
मनपा प्रशासनाकडून सीलची कारवाई केली जात असल्याने मनपा गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईत जावून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ना. शिंदे यांनी तोडगा काढण्यासंदर्भात आश्‍वासन देवून थकबाकीपोटी किमान २५ टक्के रक्कम भरण्याची गाळेधारकांना सूचना केली. त्यांच्या सुचनेनुसार गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गाळेधारकांची बैठक घेवून २५ टक्के रक्कम भरावी असे आवाहन केले आहे. त्यानुसार सोमवारी ३५ ते ४० गाळेधारकांनी भरणा केला आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, माजी नगराध्यक्ष बंडू काळे, तेजस देपूरा, युवराज वाघ, सुरेश पाटील, पंकज मोमाया, रमेश तलरेजा, रिजवान जहॉंगिरदार, नंदू सोनार, अविनाश भोळे, सुरेंद्र चव्हाण, दिलीप साळुंखे, राम जगताप यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याकडे ५० लाखांचा धनादेश सुपूर्द केला.


कारवाई टळणार
थकबाकी भरल्यास कारवाई करणार नाही. असे प्रशासनाकडून गाळेधारकांना सांगण्यात आले होते. दरम्यान, गाळेधारक संघटनेच्या सुचनेनुसार गांधी मार्केट, भोईटे मार्केट, भास्कर मार्केट, शाहू मार्केट, वालेचा मार्केटमधील जवळपास ३५ ते ४० गाळेधारकांनी थकबाकीचा भरणा केला. अजून उर्वरीत गाळेधारक थकबाकीची २५ टक्के रक्कम भरणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली.

Related Stories

No stories found.