31 डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर भरा

3 टक्क्यांपर्यंत मिळणार सूट; कर भरण्यासाठी गर्दी
31 डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर भरा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील मालमत्ताधारकांसाठी (property owners)31 डिसेंबरपर्यंत मालमत्ताकर (Property tax) भरण्यावर 3 टक्के सुट (3 percent off) मिळणार आहे. तसेच 31 रोजी शासकीय सुट्टी असून देखील मालमत्ताकर भरण्यासाठी महापालिकेचे (Municipal Corporation) चारही प्रभाग समिती कार्यालये तसेच मार्केट वसुली विभागाचे कार्यालय खुले राहणार आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून मालमत्ताधारक मालमत्ताकर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र सद्या मनपाच्या प्रभाग समितीमध्ये दिसत आहे.

जळगाव शहरातील मालमत्ताधारकांना 31 डिसेंबर पर्यंत मालमत्ताकर भरण्यासाठी सुट दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या मालमत्ताकर वसुली विभागाकडून नियोजन सुरू केले असून 31 डिसेंबरला शासकीय सुट्टी येत असल्याने नागरिकांना करभरण्याचा लाभ घेता यावा यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील महापालिकेचे चार ही प्रभाग समिती कार्यालये सकाळी दहा ते दुपारी 2 पर्यंत खुले राहणार आहे.

1 जानेवारी पासून शास्ती

मालमत्ताकर 31 डिसेंबर पर्यत भरल्यास मनपाकडून सुट दिली जाणार आहे. त्यानंतर 1 जानेवारी पासून मालमत्तेच्या रक्कमेवर मनपाकडून शास्ती (दंड) लावली जाणार आहे. त्यासाठी जास्ती जास्त कर वसुली होण्यासाठी मनपाच्या कर वसुली विभागाकडून नियोजन सुरू आहे.

प्रभाग समिती कार्यालयात गर्दी

जळगाव शहरातील मालमत्ताधारकांना मनापकडून 31 डिसेंबर पर्यंत सुट देण्यात येते. याचा लाभ घेण्यासाठी नागरिक मनपाच्या सर्व प्रभाग समितींच्या कार्यालयातील करवसूली विभागात कर भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे. प्रभाग समिती एक मधील 1 काऊंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने प्राभाग अधिकारी यांच्या दालनात दुसरे काऊंटर कर भरण्यासाठी सुरू करावे लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com