प्रवाशांनी पादचारी पुलाचा वापर करा

मध्य रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी आवाहन
प्रवाशांनी पादचारी पुलाचा वापर करा

भुसावळ (Bhusawal) प्रतिनिधी

मध्य रेल्वेने (Central Railway) सर्व स्थानकांवर निकषांनुसार योग्य ठिकाणी पुरेशा प्रमाणात पादचारी पूल (foot over bridge) उपलब्ध करून दिले आहेत. परंतु तरीही काही प्रवासी स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी किंवा एका प्लॅटफॉर्मवरून (Platform) दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रुळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालून ट्रेनच्या कामकाजात अडथळा निर्माण करतात.

या संदर्भात स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी/बाहेर पडण्यासाठी किंवा एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पूल (एफओबी) वापरण्यासाठी स्थानकांवर नियमितपणे घोषणा केल्या जात आहेत.

(rpf) आरपीएफने रूळांवरील अतिक्रमण (ट्रेसपासींग) करणार्‍यांविरुद्धच्या मोहिमेदरम्यान याची जाणीव करून दिली आहे की रेल्वे रूळ ओलांडणे केवळ त्यांच्या जीवालाच धोका देत आहे. ते रेल्वे कायद्यानुसार दंडनीय आहे.तरी प्रवाशांनी रूळांवरील अतिक्रमण (ट्रेसपासींग) टाळावे आणि स्थानकांवरील एफओबी/एस्केलेटर/लिफ्टचा वापर करावा. असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.