पारोळेकरांनो सावधान.. विना मास्क फिराल तर...

पारोळेकरांनो सावधान.. विना मास्क फिराल तर...

पारोळा Parola | प्रतिनिधी

मागील काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण (Corona patient) वाढत असल्याने प्रशासनातर्फे नागरिकांना मास्क लावण्याबाबत (wearing a mask) वेळोवेळी आव्हान करण्यात येत आहे. तरीही अनेक नागरिक प्रशासनाच्या या आव्हानाकडे कानाडोळा करीत आहेत. म्हणूनच आज पारोळा येथे पोलीस प्रशासन (Police administration) व पारोळा नगरपालिका(Parola Municipality) यांनी मास्क न वापरणार्‍या नागरीकांवर संयुक्तपणे कारवाई (Action) करीत २२ जणांवर प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे 4400 रुपये वसूल करून कारवाई करण्यात आली.

यात चार हजार चारशे रुपये दंड वसूल केला, या कारवाईत पारोळा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक टि,डी, नरवाडे संदीप पाटील, संकेत पाटील, सतिश चौधरी, पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे,उपनिरीक्षक योगेश जाधव,सत्यवान पवार,कॉ. सुनिल साळुंके, राहुल पाटील, दिपक आहिरे,राहुल पाटील,अभिजित पाटील,राहुल कोळी,हिरालाल पाटील,प्रभाकर पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

पुढे या ही कारवाईत सातत्य राहाणार असल्याचे पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक ज्योती भगत यांनी दैनिक देशदूतच्या च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ही मोहीम दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबविण्यात येणार आहे तरी नागरिकांनी सतर्क राहून मास्क वापरत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आव्हान पोलिस व नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com